वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानच्या मिस्ट्री गर्लचं ट्वीट व्हायरल, भारतात येण्याबाबत म्हणाली…

| Updated on: Sep 30, 2023 | 4:20 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारताचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 ऑक्टोबरला होणार आहे. पण चर्चा भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याची रंगली आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानच्या मिस्ट्री गर्लचं ट्वीट व्हायरल, भारतात येण्याबाबत म्हणाली...
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यापूर्वीच मिस्ट्री गर्लची चर्चा, नेमकं काय झालं ते वाचा
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा जस जशी जवळ येत आहे तस तशी त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेत अनेक विक्रम, मोठे उलटफेर पाहायला मिळतील यात शंका नाही. त्याचबरोबर काही घडामोडी कायमच्या लक्षात राहण्यासारख्याही असतील. त्यामुळे वनडे वर्ल्डकपचा महाकुंभ सुरु होण्याची सर्वच आतुरतेने वाट पाहात आहे. त्या दृष्टीने आता वातावरण निर्मितीही होत आहे. सोशल मीडियावर आपल्या देशाला पाठिंबा देत वाकयुद्धही रंगलं आहे. असं असताना अफगाणिस्तानची मिस्ट्री गर्ल वाझमा अयूबी चर्चेत आली आहे. तिच्या ट्वीटमुळे आता भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगतदार होणार यात शंका नाही. तसेच मैदानात आणि टीव्ही मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या राहतील यात दुमत नाही. नेमकं तिने काय ट्वीट केलं आणि सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे ते जाणून घेऊयात

मिस्ट्री गर्ल वाझमा अयूबी हीने काय ट्वीट केलं आहे

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 ऑक्टोबरला सामना होणार आहे. “मी भारतात येणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना 11 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी मी दिल्लीत येणार आहे.”, असं ट्वीट वाझमा अयूबी हीने केलं आहे. त्यामुळे तिच्याकडे अनेकांच्या नजरा खिळलेल्या असतील.

आशिया कप 202 स्पर्धेदरम्यान मिस्ट्री गर्ल्ड वाझमा अयूबी चर्चत आली होती. अफगाणिस्तानच्या प्रत्येक सामन्यात तिने हजेरी लावली होती. पण यंदाच्या आशिया कप स्पर्धेत तिला श्रीलंका किंवा पाकिस्तानात अफगाणिस्तानला सपोर्ट करण्यासाठी येता आलं नाही. मात्र युएईमधून तिने अफगाणिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. वाझमा युएईला राहते आणि तिथेच काम करते.

वाझमा ही मॉडेल आणि इन्स्टाग्राम इंन्फ्ल्युएन्सर आहे. तिचे जगभरात 687K फॉलोअर्स आहेत. वाझमा फॅशन डिझाइनर आहे. तिने डिझाइन केलेला सुट परिधान करून अफगाणिस्तान क्रिकेट संघ भारतात वर्ल्डकपसाठी रवाना झाला आहे. याबाबत तिनचे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

“हा काही सूटचा प्रश्न नाही. पण उत्तम क्षमता असलेल्या खेळाडूंवर शोभून दिसतो. मलाच खरंच आनंद होतो की मला अफगाणिस्तानच्या खेळाडूंसाठी ड्रेस डिझाईन करण्याची संधी मिळाली. हे कपडे मी प्रेमाने शिवले आहेत.”, अशी पोस्ट वाझमा अयूबी हीने केली आहे. तसेच यासाठी फक्त दोन दिवसांचा अवधी मिळाल्याची नोटही लिहिली आहे.

आशिया कप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यानंतर तिने भारताला पाठिंबा दिला. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं कौतुक केलं. तसेच विराट कोहलीने वनडेत 13 हजार धावांचा पल्ला गाठल्यानंतर स्पेशल पोस्ट लिहिली होती.