नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज 15 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. इंग्लंडने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगला बोलावलं. अफगाणिस्तानने टॉस गमावूनही मिळालेल्या बॅटिंगच्या संधीचं सोन केलंय. आम्ही किमान 300 धावा करु असं कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी टॉसदरम्यान म्हणाला. त्यानुसार अफगाणिस्ताच्या सलामी जोडीने इंग्लंड विरुद्ध कडक सुरुवात केलीय. अफगाणिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन रहमानुल्लाह गुरुबाज याने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या बॉलिंगवर जोरदार फटेकबाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं.
रहमानुल्लाह गुरुबाज याने सामन्यातील 11 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. रहमानुल्लाह याने 33 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आणि 151.52 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. रहमानुल्लाहच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. रहमानुल्लाह आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये वेगवान शतक ठोकणारा अफगाणिस्तानचा पहिला आणि एकूण चौथा फलंदाज ठरला.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रम हा श्रीलंकेच्या कुसल मेंडीस याच्या नावावर आहे. मेंडीसने 25 बॉलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध हे अर्धशतक केलं होतं. टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्मा याने अफगाणिस्तान विरुद्ध 30 बॉलमध्ये फिफ्टी केली. पाकिस्तानच्या सौद शकील याने नेदरलँड्स विरुद्ध 32 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलंय. तर एडम मारक्रम याने श्रीलंका विरुद्ध 34 बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली होती.
वर्ल्ड कप 2023 मधील वेगवान अर्धशतक
4th fastest fifty in this world cup. What a batting display from Rahmanullah Gurbaz. pic.twitter.com/KFPnTZ4xaZ
— Kawsar Hossain (@Khnaeem962) October 15, 2023
दरम्यान रहमानुल्लाह याला शतक करण्याची संधी होती. रहमानुल्लाह अर्धशतकानंतर आणखी वेगात धावा करु लागला. त्यामुळे रहमानुल्लाहचं शतक निश्चित मानलं जात होतं. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि उशिराने नॉन स्ट्राईक एंडवरुन धावल्याने रहमानुल्लाह स्ट्राईक एंडवर 80 धावांवर रन आऊट झाला. सब्टीट्युड डेव्हिड व्हिली याने केलेल्या अचूक थ्रोमुळे रहमानुल्लाह याला मैदानाबाहेर जावं लागलं. रहमानुल्लाह शतक हुकल्याने संतापलेला. रहमानुल्लाहने 57 बॉलमध्ये 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.