Video : 6,6,6,6,6,6…एका षटकात कुटल्या 48 धावा, ऋतुराज गायकवाड याच्यासोबत साधली बरोबरी

| Updated on: Jul 29, 2023 | 8:36 PM

क्रिकेट या खेळात रोज नव्या विक्रमांची नोंद होत असते. आतापर्यंत एका षटकात 7 षटकार मारणंही शक्य आहे असंच म्हणावं लागेल. 21 वर्षीय फलंदाजाने ही किमया साधली आहे.

Video : 6,6,6,6,6,6...एका षटकात  कुटल्या 48 धावा, ऋतुराज गायकवाड याच्यासोबत साधली बरोबरी
Video : 21 वर्षीय फलंदाजाकडून दे दणादण, सात उत्तुंग षटकार ठोकत ऋतुराज गायकवाड याच्या पंगतीत स्थान
Follow us on

मुंबई : क्रिकेट हा खेळ असा आहे की कधी काय होईल सांगता येत नाही. काल परवापर्यंत अशक्य वाटत असलेले रेकॉर्डही होताना दिसत आहेत. असाच विक्रमाची पुन्हा एकदा नोंद झाली आहे. अफगाणिस्तानच्या 21 वर्षीय सेदिकुल्लाह अटल याने एका षटकात 7 षटकार ठोकले आहेत. गोलंदाजी करणाऱ्या आमिर जजाई याला त्याने सळो की पळो करून सोडलं. काबुल प्रीमियर लीगच्या दहाव्या सामन्यात शाहीन हंटर्स आणि अबासिन डिफेंडर्स हे दोन संघ आमनेसामने होते. शाहीन हंटर्स पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. खराब सुरुवात करूनही शाहीन हंटर्सने बाजी मारली आणि विजयाचा हिरो ठरला तो सेदिकुल्लाह अटल..

सेदिकुल्लाह अटल याने आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकले. संघाचे गडी झटपट बाद झाल्यानंतरही अटल क्रिजवर एक बाजू पकडून होता. इतकंच काय तर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात उभा राहील. संघाचे तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर संघावर दडपण आलं होतं. पण त्याने 56 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 118 धावा केल्या. 19 व्या षटकात तर त्याने गोलंदाजीच्या चिंध्या उडवल्या.

सेदिकुल्लाह अटलने असा पाडला षटकारांचा पाऊस

जजाईच्या गोलंदाजीवर अटलने षटकारांचा पाऊस पाडला. इतकंच काय तर 6 चेंडूत 48 धावा केल्या. 19 व्या षटकाचा पहिला चेंडू जजाईने नो टाकला आणि इथूनच धोबीपछाड सुरु झाला. नो बॉलवर षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड टाकला आणि त्यावर चौकार आला. त्यानंतर टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर त्याने उत्तुंग षटकार ठोकला. या षटकात एकूण 48 धावा आल्या.

ऋतुराज गायकवाड याची केली बरोबरी

सेदिकुल्लाह अटल हा 71 धावांवर होता पण सात उत्तुंग षटकार ठोकत थेट 113 धावा केल्या. तसेच एका ओव्हरमध्ये 7 षटकार ठोकत ऋतुराज गायकवाडच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ऋतुराज गायकवाड याने मागच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग 7 षटकार ठोकले होते.

सामना 92 धावांनी जिंकला

अटलच्या धमाकेदार खेळीमुळे शाहीन हंटर्स संघाने 214 धावा केल्य आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना डिफेंडर्स संघ 121 धावांवरच सर्वबाद झाला. हा सामना हंटर्सने 92 धावांनी जिंकला. सैद खान आणि जाहिदुल्लाह यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.