Asia Cup 2022 : या अंकलच्या DANCE नंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या फॅन्समध्ये हाणामारी, पाहा VIDEO

| Updated on: Sep 08, 2022 | 1:27 PM

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने सुध्दा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर प्रत्येकवेळी अफगाणिस्तानकडून असं केलं जात असं म्हटलं आहे.

Asia Cup 2022 : या अंकलच्या DANCE नंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या फॅन्समध्ये हाणामारी, पाहा  VIDEO
चिडलेल्या प्रेक्षकांनी जोरदार मारहाण केली
Image Credit source: tv9marathi
Follow us on

बुधवारी अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये एक रंगत पाहायला मिळाली. त्याचबरोबर दोन्ही संघातील खेळाडूंचा संघर्ष पाहायला मिळाला. रोमांचक झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी झाला. त्यावेळी दुबईतील (Dubai) शारजा मैदानात दोन्ही संघाचा प्रेक्षकवर्ग अधिक होता. काल अनेक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मारहाण सुद्धा केली आहे.

कालपासून व्हिडीओची चर्चा

सोशल मीडियावर काल रात्रीपासून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या डान्सनंतर दोन्ही प्रेक्षकांमध्ये भांडण सुरु झाल्याची चर्चा आहे. पण हे प्रकरण नेमकं खरं आहे का ? या बाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण सोशल मीडियावर त्याची अधिक चर्चा आहे

व्हिडीओत काय आहे

दुबईतील शारजा मैदानात पाकिस्तानचा टी शर्ट घालून प्रेक्षक नाचत आहे. त्याचबरोबर त्याला पाहून इतर प्रेक्षक सुद्धा नाचत आहेत. त्यामुळे इतर प्रेक्षक त्याला उत्साहित करीत आहेत. कालचा सामना इतर सामन्यांपेक्षा वेगळा असल्याने मैदानात क्रिकेट पाहत असलेल्या प्रेक्षकांनी खेळाचा आनंद लुटला आहे.

चिडलेल्या प्रेक्षकांनी जोरदार मारहाण केली

ज्यावेळी पाकिस्तानचा प्रेक्षक अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना चिडवतं होता. त्यावेळी सामना कोणाच्या पारड्यात झुकणार हे माहित नसल्याने दोन्हीकडून मज्जा घेतली जात होती. पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या चिडलेल्या प्रेक्षकांनी पाकिस्तानच्या प्रेक्षकांना जोरदार मारहाण केली अशी चर्चा आहे.

शोएब अख्तरने सुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने सुध्दा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर प्रत्येकवेळी अफगाणिस्तानकडून असं केलं जात असं म्हटलं आहे.