मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातील दोन्ही संघांची उपांत्य फेरीची वाट स्पष्ट करणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. दोन्ही संघांचा हा सहावा सामना आहे. जिंकणाऱ्या संघाचे एकूण 6 गुण होतील आणि उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. तर पराभूत झालेल्या संघांचं वाटचाल कठीण होईल. अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या दिग्गज संघांना पराभूत केलं आहे. त्यामुळे श्रीलंकेला अफगाणिस्तानचा पेपर कठीण असेल यात शंका नाही. श्रीलंकेचा नेट रनरेट चांगला असल्याने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. तर अफगाणिस्तानचा संघ सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघातील 11 खेळाडूंची निवड करणं कठीण आहे. असं असलं तरी मागची आकडेवारी पाहता निवड करता येईल.
श्रीलंकेकडून निसांका आणि कुसल मेंडिस आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. तर अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाज आणि जादरान यांनीही आपल्या छाप सोडली आहे. त्यामुळे खेळाडूंची निवड करताना संभ्रम तर असणारच आहे. कर्णधार म्हणून कुसल मेंडिस हा प्रमुख दावेदार ठरू शकतो. कारण आक्रमक फलंदाजी पाहता पॉइंट्सचं गणित सुटू शकतं. त्याचबरोबर अँजोलो मॅथ्यूज हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो. तर गुरबाज हा देखील मोठा उलटफेर करू शकतो.
श्रीलंक आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना पूरक आहे. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदान पूरक असल्याने नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा आहे. कौल आपल्या बाजूने लागल्यास कर्णधार गोलंदाजी करणं पसंत करेल.
विकेटकीपर: कुसल मेंडिस (कर्णधार) इब्राहिम अलीखिल
फलंदाज: रहमानुल्लाह गुरबाज (उपकर्णधार), पथुम निसांका, इब्राहिम जादरान
ऑलराउंडर्स: अँजेलो मॅथ्यूज, दुनिथ वेल्लालागे, राशिद खान
गोलंदाज: दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका फजल हक फारूकी
विकेटकीपर: कुसल मेंडिस इब्राहिम अलीखिल
फलंदाज: सदीरा समरविक्रमा, हश्मतुल्लाह शाहिदी, कुसल परेरा
ऑलराउंडर्स: अँजेलो मैथ्यूज (कर्णधार), राशिद खान, धनंजय डी सिल्वा
गोलंदाज: दुष्मंथा चमीरा, मुजीब उर रहमान, कसुन रजिता.
श्रीलंका: पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/ विकेटकीपर) सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तीक्षणा, कसुन रजिता, दुष्मंता चमीरा, दिलशान मदुशंका.
अफगानिस्तान: रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्लाह उमरजई, इकराम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.