AUS vs AFG Toss | अफगाणिस्तानने टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

| Updated on: Nov 07, 2023 | 1:55 PM

Australia vs Toss Afghanistan | ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील हा आठवा सामना आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे.

AUS vs AFG Toss | अफगाणिस्तानने टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाला मोठा झटका
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 39 वा सामना आज 7 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामेन आहेत. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. अफगाणिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याची संधी आहे. तर अफगाणिस्तानला सेमी फायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघात बदल

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने 2 बदल केलेत. तर अफगाणिस्तानने एकमेव बदल केलाय. अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हनमध्ये फझलहक फारुकी याच्या जागेवर नवीन उल हक याची एन्ट्री झालीय. तर ऑस्ट्रेलिया टीममध्ये मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल परतले आहेत. तर स्टीव्हन स्मिथ आणि कॅमरुन ग्रीन या दोघांना बाहेर बसावं लागलंय.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

क्रिकेट आणि वर्ल्ड कप इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानवर कायम वरचढ राहिली आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 3 वनडे आणि वर्ल्ड कपमध्ये 2 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने वनडे आणि वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला आहे. मात्र अफगाणिस्तान उलटफेर स्पेशालिस्ट आहे. अफगाणिस्तानने हे करुन दाखवलंय. अफगाणिस्तानने या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये 4 सामने जिंकले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात इंग्लंड वर्ल्ड कप विजेत्या संघांना पराभूत केलंय. त्यामुळे अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया विरुद्धही उलटफेर करत सलग चौथा आणि एकूण पाचवा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

अफगाणिस्तानने टॉस जिंकला

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.