NED vs AFG | अफगाणनिस्तानचा नेदरलँड्सवर 7 विकेट्सने विजय, पाकिस्तानला झटका

| Updated on: Nov 03, 2023 | 8:32 PM

Netherlands vs Afghanistan | अफगाणिस्तानने नेदरलँड्सला आधी 179 धावांवर रोखलं. त्यानंतर अवघ्या 3 विकेट्स गमावून अफगाणिस्तानने 180 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं.

NED vs AFG | अफगाणनिस्तानचा नेदरलँड्सवर 7 विकेट्सने विजय, पाकिस्तानला झटका
Follow us on

लखनऊ | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील चौथा विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने या विजयासह सेमी फायनलमधील आपलं आव्हान कायम ठेवलंय. नेदरलँड्सने अफगाणिस्तानला विजयासाठी 180 रन्सचं टार्गेट दिलं होतं. अफगाणिस्तानने हे आव्हान 3 विकेट्स गमावून अवघ्या 31.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानसह न्यूझीलंडचंही टेन्शन वाढलंय.

अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज याने 10 धावा केल्या. इब्राहीम झद्रान याने 20 रन्सचं योगदान दिलं. रहमत शाह याने 54 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझई या जोडीने अफगाणिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं. कॅप्टन हशमतुल्लाह याने 64 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 56 रन्स केल्या. तर अझमतुल्लाहने 28 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या. नेदरलँड्सकडून लोगान वान बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे आणि साकिब झुल्फिकार या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

अफगाणिस्तानचा सलग तिसरा विजय

दरम्यान अफगाणिस्तानचा हा वर्ल्ड कपमधील सलग तिसरा विजय ठरला. अफगाणिस्तानने याआधी 23 ऑक्टोबरला पाकिस्तान आणि 30 ऑक्टोबरला श्रीलंकाचा धुव्वा उडवला. अफगाणिस्तानने या सलगच्या तिसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानला झटका दिलाय. अफगाणिस्तानने पाकिस्तानला मागे टाकलंय. अफगाणिनस्तान 8 पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. अफगाणिस्तानचा आता पुढील सामना हा 7 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

अफगाणनिस्तानची विजयी हॅटट्रिक


नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नूर अहमद.