मुंबई : वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलच्या थराराला अवघे काही तास बाकी आहेत. भारतासाठी परत एकदा न्यूझीलंड संघाचं आव्हान असणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात असल्याने टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र याआधी भारताला झटका दिला असल्याने रोहितसेना कानाला खडा लावून मैदानात उतरेल. मात्र आयपीएल गाजवणारा न्यूझीलंड संघाचा ओपनर डेव्हॉन कानवे याने भारताला चॅलेंज दिलं आहे.
भारताचा संघ धोकादायक असली तरी आम्ही तयार आहोत. सेमी फायनल सामना यजामान संघाविरूद्ध खेळणं मोठी गोष्ट आहे. आमच्या संघातही अनेक अनुभवी खेळाडू आहेत ज्यांनी अशा परिस्थितींचा सामना केला आहे. त्या खेळाडूंच्या अनुभवाचा संघाला नक्कीच होईल. आमचं टार्गेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळण्याचं असून त्यापासून आम्ही दूर आहोत, असं डेव्हॉन कॉनवेने म्हटलं आहे.
रचिन रविंद्र याच्यासाठी हा खास वर्ल्ड कप आहे. आम्हाला सर्वांना माहित आहे की तो एक चांगला खेळाडू आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली असल्याचंही कॉनवेने सांगितलं. आयपीएलमध्य कॉनवे हा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना कॉनवेने सीएसकेसाठी चांगली दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेकदा त्याने चांगली सुरूवात करून दिली आहे.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमधील टॉप 3 मध्ये रचिन रवींद्र याचा समावेश आहे. रचिन याने आतापर्यंत तीन शतके आणि एक अर्धशतक करत धावा केल्या आहेत. लीग स्टेजमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतान न्यूझीलंड संघाचा पराभव केला होता. त्या सामन्यातही रविंद्र याने 95 धावा करत संघासाठी महत्त्वाची खेळी केली होती.
केन विलियमसन (C), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (VC), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग