2013 चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारत खेळला 10 आयसीसी स्पर्धा, असा राहिला प्रवास; जाणून घ्या

| Updated on: Jun 26, 2024 | 10:05 PM

टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवलं आहे. टीम इंडिया 27 जूनला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. 2013 नंतर टीम इंडिया ही 11वी स्पर्धा खेळत आहे. चला जाणून घेऊयात आतापर्यंत काय केलं ते

2013 चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारत खेळला 10 आयसीसी स्पर्धा, असा राहिला प्रवास; जाणून घ्या
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजय घोडदौड सुरु आहे. साखळी फेरीनंतर सुपर 8 फेरीतही टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र आता बाद फेरीत टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. बाद फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात करो या मरोची लढाई आहे. टीम इंडियाने 10व्यांदा बाद फेरीत स्थान मिळवलं आहे. सलग या ग्रपमध्ये एन्ट्री घेऊनही भारताला 2013 पासून आतापर्यंत एकही जेतेपद मिळवता आलेलं नाही. टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेचं शेवटचं जेतेपद महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये जिंकला होता. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये इंग्लंडला त्याच्यात धरतीवर मात दिली होती. येथून पुढे टीम इंडियाने एकही जेतेपद जिंकलेलं नाही. भारताने 2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत निराशाच पदरी पडली आहे. 2009, 2010, 2012 मध्ये ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळावा लागला. 2014 मध्ये श्रीलंकेने अंतिम फेरीत पराभूत केलं. 2016 मध्ये वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत हरवलं. 2021 मध्ये ग्रुप स्टेजमध्ये बाहेर, 2022 मध्ये इंग्लंडने उपांत्य फेरीत पराभूत केलं.

भारताने शेवटचा वनडे वर्ल्डकप 2011 मध्ये जिंकला होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत, 2019 मध्ये न्यूझीलंडने उपांत्य फेरीत, तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत पराभूत केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सांगायचं तर, 2017 मध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याची दोनदा संधी मिळाली. पण दोन्ही वेळेस पदरात निराशा पडली. 2021 मध्ये न्यूझीलंडकडून आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

टीम इंडियाने 2013 पासून आतापर्यंत दहा आयसीसी स्पर्धामध्ये भाग घेतला. 9 वेळा बाद फेरीत स्थान मिळवलं आणि एकदा साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. 9 बाद फेरीत भारताने 13 सामने खेळले आहेत. यापैकी 9 सामन्यात पराभव आणि 4 सामन्यात विजय मिळाला आहे. या दरम्यान भारताने 4 उपांत्य फेरी आणि 5 अंतिम सामने गमवले आहेत.  मागच्या 11 वर्षात 5 वेळा जेतेपद मिळवता मिळवता चुकला आहे.