PAK vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपली, Video झाला व्हायरल

| Updated on: Dec 05, 2023 | 7:36 PM

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा कसून सराव सुरु आहे. 14 डिसेंबरला पहिला सामना सुरु होणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. यात सरफराज आणि शकील यांच्यात वाद झाल्याचं दिसत आहे. पण हा वाद नेमका कशामुळे झाला हे कळत नाही. पण सरफराज अहमदने शकीलला बऱ्यापैकी सुनावलं.

PAK vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपली, Video झाला व्हायरल
PAK vs AUS : सरफराज आणि शकील यांच्यात तू तू मैं मैं, वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. श्रीलंकेला दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभूत केल्याने 100 टक्के विजयी गुणांकनासह अव्वल स्थान गाठलं आहे. आता हे अव्वल स्थान कायम ठेवण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर आहे. पाकिस्तानचा संघ तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या सामन्यात एक पराभव किंवा ड्रॉ अव्वल स्थान हिरावून घेईल. त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियामध्ये 2017 पासून भारतीय संघ सोडला तर कोणीही विजय मिळवू शकला नाही. 2017 पासून ऑस्ट्रेलियाने भारत सोडून इतर संघांसोबत 23 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 20 सामन्यात विजय, तर 3 सामने ड्रॉ झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान असणार आहे. असं एकंदरीत चित्र असताना सराव सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंनी जोरदार सराव केला. पण या सरावादरम्यान माजी कर्णधार सरफराज खान आणि सऊद शकील यांच्यात बाचाबाची झाली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरफराज अहमदने ज्युनिअर खेळाडू सऊद शकील याला काही काम करण्यास सांगितलं होतं. पण त्याने ते काम केलं नाही. यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये खडाजंगी झाली. व्हिडीओत सऊद शकील सांगत आहे की, कधीपर्यंत मी तुझ्या कामी येत राहील? यावर सरफराजला राग आला आणि त्याने प्रत्युत्तर देत म्हणाला की, ‘भावा, माझ्या कोणत्याच कामी येणार नाहीस. मी तर तुला काहीच सांगितलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी तुला काहीच सांगितलं नाही. मी कधी सांगितलं की स्वॅप कर. मला ज्याच्याशी स्वॅप करायचं होतं ते मी केलं आहे.’

पाकिस्तानचा संघ नवीन कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली 14 डिसेंबरला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान एक सराव सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध प्राइम मिनिस्ट इलेव्हन यांच्यात होणार आहे.

पाकिस्तानचा संघ : अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, इमाम उल हक, सइम अयुब, सउद शकील, शान मसूद (कर्णधार), आमेर जमाल, सलमान अली आघा, फहीम अश्रफ, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सरफराज अहमद (विकेटकीपर), अब्रार अहमद, हसन अली, खुर्रम शहजाद, मिर हमजा, मोहम्मद वासिम ज्यु, नोमन अली, शाहीन अफ्रिदी