IND vs PAK | पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हा खेळाडू कॅप्टन

| Updated on: Dec 17, 2023 | 7:18 PM

India vs Pakistan | भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

IND vs PAK | पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हा खेळाडू कॅप्टन
Follow us on

मुंबई | भारत आणि पाकिस्तान 2 सख्खे शेजारी आणि पक्के वैरी. मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडले. तसेच पाकिस्तानकडून वेळोवेळी सीमेवर करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारताने पाकिस्तानसोबतचे अपवाद वगळता जवळपास सर्व संबंध तोडले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना द्विपक्षीय मालिकेसाठीही भारतात परवानगी नाही. तसेच टीम इंडियाही पाकिस्तानमध्ये जात नाही. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेला आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मुद्दाही चांगला गाजला.

बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी आमच्या खेळाडूंना पाकिस्तानला पाठवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळेटीम इंडियाचे सामने हे श्रीलंकेत आयोजित करण्यात आले. मात्र आता टीम इंडिया पाकिस्तानला जाणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी जाणार आहे.या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा सामना कधी होणार, टीममध्ये कोण आहे, कॅप्टन कोण असणार हे आपण जाणून घेऊयात.

इस्लामाबादमध्ये डेव्हिस कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील वर्ल्ड ग्रुप एकमधील प्ले ऑफ सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियात रामकुमार रामनाथन, एन श्रीराम बालाजी, युकी भांबरी, निकी कालियांदा पूनाचा, साकेत माइनेनी आणि दिग्विजय प्रताप सिंह (राखीव) यांना संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियाचं नेतृत्व कुणाकडे?

रामनाथन-पुनाचा एकेरी तर बालाजी-माईनेनी यांच्यापैकी कोणत्याही दोघांना दुहेरी सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते. रोहित राजपाल टीमचा कॅप्टन असेल. तर जीशान अली कोच असणार आहे.

टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

1964 नंतर टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर

दरम्यान टीम इंडिया 1964 नंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाने 1964 साली 4-0 ने विजय मिळवला होता. टीम इंडिया अद्याप पाकिस्तान विरुद्ध अजिंक्य आहे. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 8 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अखेरचा सामना हा 2019 साली त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात आला होता. तेव्हा टीम इंडियाने हा सामना 4-0 अशा फरकाने जिंकला होता. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे क्रीडा चाहत्यांचं लक्ष असणार आहे.