KKR vs RCB : केकेआर कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानात उतरताच रचला विक्रम, असं करणारा पहिला भारतीय

| Updated on: Mar 22, 2025 | 8:24 PM

आयपीएलच्या 18व्या पर्वाचा थरार सुरु झाला आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला. पण केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने एका विक्रमाची नोंद केली.

KKR vs RCB : केकेआर कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानात उतरताच रचला विक्रम, असं करणारा पहिला भारतीय
अजिंक्य रहाणे
Image Credit source: KKR Twitter
Follow us on

आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य राहणेने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 6 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. शांत संयमी अजिंक्य रहाणेचा आक्रमक अंदाज पाहून प्रत्येक जण हैराण झाला. कोलकात्याचं कर्णधारपद भूषवताना त्याच्यात आक्रमकपणा दिसेल का? असा प्रश्न विचारला जात होता. पण पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेने सर्वांची तोंड बंद केली आहे. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेने पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये तीन संघांचं कर्णधारपद भूषवणारा पहिला भारतीय ठरला आहे. रहाणेने 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्यानंतर 2018 आणि 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी होता. आता कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत आहे.

नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘या संघाचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. आमची तयारी चांगली झाली आहे, कोअर ग्रुपही तसाच आहे. आधी चांगली फलंदाजी करण्याची आणि नंतर बचाव करण्याची अपेक्षा आहे. हे सर्व खेळाडूंना स्वातंत्र्य देण्याबद्दल आणि त्यांना एक संघ म्हणून खेळण्याची परवानगी देण्याबद्दल आहे. आम्ही ३ वेगवान गोलंदाज आणि 3 फिरकीपटू खेळवत आहोत.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल