कसोटीत स्थान मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे आता टी 20 साठी सज्ज? ‘या’ खेळाडूचं स्थान धोक्यात

| Updated on: Apr 25, 2023 | 12:57 PM

अजिंक्य रहाणेनं आयपीएल 2023 स्पर्धेत धमाका केला आहे. त्याची ही खेळी पाहून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याला स्थान देखील मिळालं आहे. असं असताना आता भारतीय टी 20 संघातील एका खेळाडूला चांगलाच घाम फुटला आहे.

कसोटीत स्थान मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे आता टी 20 साठी सज्ज? या खेळाडूचं स्थान धोक्यात
अजिंक्य रहाणेची आयपीएलमध्ये चांदी आणि कसोटीत संधी, टी 20 संघातील या खेळाडूचं टेन्शन वाढलं
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : आयपील 2023 स्पर्धेत अजिंक्य रहाणेची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याची स्फोटक फलंदाजी पाहून चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फुटला आहे. शांत आणि सयंमी अशी काहीशी छबी असलेल्या अजिंक्य रहाणेचा मैदानातील आक्रमक पवित्रा पाहून क्रीडारसिक खूश झाले आहेत. रहाणेच्या फॉर्ममुळे चेन्नई सुपर किंग्स जबरदस्त फायदा झाला आहे. अजिंक्य रहाणे प्रत्येक सामन्यात 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याची वर्णी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये लागली आहे. आता त्याला टी 20 संघातही स्थान मिळेल अशी दाट शक्यता आहे. संघातील एका खेळाडूचं स्थान धोक्यात आलं आहे.

टी 20 विश्वचषक 2022 मध्ये पराभव झाल्यानंतर संघाची सूत्र हार्दिक पांड्याकडे सोपण्यात आली आहेत. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाखालील संघात तो पुनरागमनाचा दावा करू शकतो. खरं तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याची निवड होऊ शकते. राहुल त्रिपाठी सध्या भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. पण त्याची कामगिरी काही चांगली दिसून आली नाही.

राहुल त्रिपाठीने टीम इंडियासाठी 5 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने 19.4 च्या सरासरीने 97 धावा केल्या आहेत. यामुळे त्याच्या जागी संघात अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. आयपीएल लिलावात चेन्नईने रहाणेवर विश्वात 50 लाख रुपयांना आपल्या संघात सहभाग केलं होतं. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं त्या संधीचं सोनं केलं.

आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर गुजरात आणि लखनऊ विरुद्धच्या सामन्यात रहाणेला संधी मिळाली नाही. थेट मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीने त्याला संधी दिली. वानखेडेवर अजिंक्य रहाणेनं तुफान फलंदाजी केली. 27 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर 61 धावा केल्या. राजस्थान विरुद्ध 31 धावांची खेळी केली.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात त्याने 20 चेंडूत 37 धावा केल्या. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 9 धावांवर तंबूत परतला. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने 29 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. अजिंक्यचा फॉर्म पाहता त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या संघात निवड करण्यात आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.