मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामधील थरार वाढतच चालला आहे. सामना कधी ऑस्ट्रेलिया तर कधी इंग्लंडच्या पारड्यामध्ये झुकताना दिसला. पाचव्या दिवशी, 281 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या गोलंदाजांनी कांगारूंना धक्के दिले. उस्मान ख्वाजा हा एकटा मैदानात पाय रोवून बसला होता. त्यालाही 65 धावांवर माघारी पाठवलं.
209 धावांत 7 गडी बाद झाल्यानंतर संघाला विजय मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी आणि कर्णधार पॅट कमिन्स यांच्यावर येऊन पडली होती. पण कॅरीला आऊट करताना जो रूटने खतरनाक झेल घेतला. गोळीच्या वेगाने चेंडू चालला होता मात्र रूटने एखाद्या बुरूजासारखे आपले दोन्ही हात मध्ये घालत कॅच पकडला.
पाहा व्हिडीओ-
WHAT. A. GRAB.
Joe Root makes no mistake this time!
Eight down. #EnglandCricket |#Ashes pic.twitter.com/aUl8MeRbwm
— England Cricket (@englandcricket) June 20, 2023
81 व्या ओव्हरमध्ये जो रूट गोलंदाजी करत होता, तिसऱ्या चेंडूवर कॅरी मोठा फटका खेळण्यासाठी पुढे आला आणि चेंडू जोरात फटकावला. त्यावेळी रूटने अचूक टायमिंग साधत कॅच घेतला. कॅरी 50 चेंडूत 20 धावा करून आऊट झाला आणि 227 ला कांगारूंच्या आठ विकेट्स पडल्या.
कॅरीने पहिल्या डावामध्ये दमदार फलंदाजी केली होती. 99 चेंडूत त्याने 66 धावा केल्या होत्या यामध्ये त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला होता. मात्र दुसऱ्या डावात तो रूटचा शिकार झाला.
दरम्यान, कांगारूंना आता जिंकण्यासाठी 46 चेंडूत 12 धावांची गरज असून मैदनावर पॅट कमिन्स नाबाद 37 धावा आणि लियॉन 10 धावांवर खेळत आहे. तर इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.