मुंबई | आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट टीमच्या स्टार ऑलराउंडर खेळाडूने निवृत्तीवरुन यूटर्न घेतला आहे. क्रिकेट वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून हा दिग्गज लवकरच वनडे क्रिकेटमधून रिटायरमेंटचा निर्णय मागे घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या ऑलराउंडरने निर्णय फिरवत टीमला मोठा दिलासा दिला आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याने आता हा खेळाडू वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे टीमची ताकद झटक्यात दुप्पट झाली आहे.
इंग्लंड क्रिकेट टीमचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. बेन स्टोक्स न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. इंग्लंड क्रिकेट टीमने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता बेन स्टोक्स इंग्लंडसाठी वनडे क्रिकेट खेळणार आहे. बेन स्टोक्स जुलै 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता.
बेन स्टोक्स याची निवृत्तीनंतर पुन्हा एन्ट्री
🚨 JUST IN: England star reverses retirement in the lead-up to the @cricketworldcup as ECB announce squad for New Zealand ODI series!
Details 👇
— ICC (@ICC) August 16, 2023
एका बाजूला 30 ऑगस्टपासून आशिया कप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 30 ऑगस्टपासूनच इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर वनडे सीरिज पार पडणार आहे. दोन्ही मालिका या प्रत्येकी 4-4 सामन्यांच्या असणार आहेत. या दोन्ही मालिकेत जॉस बटलर हा इंग्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंग्लंड | जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स,
न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), रेहान अहमद, मोइन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मालन, आदिल राशिद, जोश टोंग, जॉन टर्नर आणि ल्यूक वुड.