आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपसाठीच्या मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये चौघांचा समावेश आहे. विकेटकीप ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल या तिघांचं कमबॅक झालं आहे. तर मुंबईचा स्टार ऑलराउंड यूएसए आणि वेस्ट इंडिजचा व्हीसा मिळवण्या यशस्वी ठरला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणारा टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. शिवम दुबे याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आणि गेल्या काही महिन्यांमध्ये बॅटिंग-बॉलिंगने दमदार कामगिरी केली आहे. तसेच हार्दिक पंड्या याला आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबईचं नेतृत्व करताना काही खास करता आलं नाही. त्यामुळे शिवमकडे हार्दिकची रिप्लेसमेंट म्हणून पाहिलं जात होतं. हार्दिकला डच्चू देत शिवम दुबेला टीम इंडियात वर्ल्ड कपसाठी संधी देण्यात यावी, अशी मागणीही नेटकऱ्यांनी केली होती. मात्र तसं काही झालं नसलं तरी शिवमला टी 20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे.
शिवम दुबेने टीम इंडियाचं 1 वनडे आणि 21 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. शिवमने टी 20 मध्ये 3 अर्धशतकांसह 276 धावा केल्या आहेत तर 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर शिवमने एकमेव वनडेत मोजून 9 धावा केल्यात. तसेच शिवमने आयपीएलमध्ये 60 सामन्यात 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 456 धावा केल्या आहेत. तर 4 विकेट्स घेतल्यात.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान