आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. आयसीसीने एक्स अकाउंटवरुन पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत पंच म्हणून 20 आणि 6 सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली आहे. यामध्ये 2 भारतीय पंचांचा समावेश करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील खेडमधील एका पंचाचा समावेश आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत नितीन मेनन आणि जयरामन मदनगोपाल या भारतीय पंचांची निवड करण्यात आली आहे. तर अल्लाउद्दीन पालेकर यांना संधी देण्यात आली आहे. अल्लाउद्दीन हे दक्षिण आफ्रिकेचे पंच आहेत. मात्र ते मूळचे कोकणातील खेडमधील आहेत. अल्लाउद्दीन यांची निवड करण्यात आल्याने पालेकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहेत.
अल्लाद्दीन पालेकर हे मुळचे महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे आहेत. पालेकर हे खेडमधील शिव या गावातील आहे. अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडील हे नोकरीनिमित्ताने दक्षिण आफ्रिकेला गेले. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले. अल्लाउद्दीन यांचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेतील. मात्र त्यांची आपल्या गावासोबतची नाळ अजूनही कायम आहे.
वर्ल्ड कपसाठी पंचांची नावं : ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, अल्लाउद्दीन पालेकर, रिचर्ड केटलबरो, जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाज्स्की, अहसान रझा, रशीद रियाझ, पॉल रीफेल, शाह रीफेल, लाइंग रॉइड्स, लांग्टन रॉडनी टकर, ॲलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन आणि आसिफ याकूब.
सामनाधिकारी : डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान