IND vs WI: कॅरेबियन गोलंदाजाची कमाल, एकाच मालिकेत विराट-रोहित जोडीची दोनदा शिकार

| Updated on: Feb 11, 2022 | 5:12 PM

टीम इंडियाचे (Team India) दोन सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका चांगली ठरलेली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले, तर पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली.

IND vs WI: कॅरेबियन गोलंदाजाची कमाल, एकाच मालिकेत विराट-रोहित जोडीची दोनदा शिकार
Rohit Sharma And Virat Kohli
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचे (Team India) दोन सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका चांगली ठरलेली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले, तर पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. त्याचवेळी माजी कर्णधार विराट कोहलीची अवस्था आणखीनच बिकट होती आणि तो तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. असे असतानाही भारताने मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे, या दोन्ही दिग्गज फलंदाजांची ही अवस्था पाहणे थोडे धक्कादायक होते आणि त्यांच्या या अवस्थेला वेस्ट इंडिजचा एका वेगवान गोलंदाजाने जबाबदार आहे. ज्याने गेल्या काही वर्षांत आपली सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. त्याच्यासमोर क्रीझवर टिकून राहणे भल्याभल्यांना कठीण झाले आहे.

अहमदाबादमध्ये शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली, मात्र चौथ्या षटकात भारताला दोन जब्बर धक्के बसले. आधी कर्णधार रोहित शर्मा आणि पाठोपाठ विराट कोहली या षटकात बाद झाला. दोन्ही दिग्गजांना अशा प्रकारे बाद करणारा गोलंदाज होता अल्झारी जोसेफ (Alzari Joseph).

मालिकेत दोनदा चमत्कार

वेस्ट इंडिजचा या वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याने त्याच्या दुसऱ्या षटकातील तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम फलंदाजांना बाद करून चाहत्यांना थक्क केले. विशेष बाब म्हणजे अल्झारीने अशी कामगिरी पहिल्यांदाच केलेली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने ही अप्रतिम कामगिरी केली होती.

अल्झारीची सर्वोत्तम कामगिरी

25 वर्षीय वेगवान गोलंदाजाने सध्याच्या मालिकेत चांगली कामगिरी केली असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. अल्झारीने आतापर्यंत 3 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. 2016 मध्ये वेस्ट इंडिजकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अल्झारी जोसेफने आतापर्यंत 43 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या खात्यात 70 विकेट्स जमा आहेत. त्याची सरासरी 27.60 आणि स्ट्राइक रेट 30 आहे.

इतर बातम्या

IPL 2022 Auction: बंगळुरुतल्या 2 दिवसांच्या महालिलावात 590 खेळाडूंची विक्री, धवन, वॉर्नर, श्रेयस, बोल्टवर सर्वांच्या नजरा

IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?

IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?