आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. आता देशांतर्गत आणि लीग स्पर्धेत अश्विन खेळताना दिसणार आहे. असं असताना त्याला भावी वाटचालीसाठी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर अश्विनला पत्र लिहून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं की, ‘अशा वेळी जेव्हा प्रत्येक जण तुझ्याकडून अधिक ऑफ ब्रेक टाकण्याची आशा करत होता, तेव्हा तू एक असा कॅरम बॉल टाकला की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविचंद्रन अश्विनला त्याच्या 14 वर्षांच्या चमकदार आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविचंद्रन अश्विनला शुभेच्छा देत भावनिक पत्र लिहिले आहे.
‘तुम्ही तुमच्या चांगल्या समज आणि योगदानासाठी ओळखले जाल. 2022 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या चेंडूवर मारलेल्या शॉटला खूप टाळ्या मिळाल्या. ज्या पद्धतीने तुम्ही बॉल सोडला. तो वाईड बॉल बनू देणे हे तुमचे चातुर्य दर्शवते.’ असं सांगत आर अश्विनचं कौतुक केलं आहे. ‘ जेव्हा तुझ्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला तो क्षण आम्हा सर्वांना आठवतो. तुम्ही मैदानात परतलात. जेव्हा चेन्नईमध्ये पूरस्थिती होती आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुम्ही ज्या प्रकारे खेळलात ते या खेळाप्रती तुमची बांधिलकी दर्शवते. जर्सी क्रमांक 99 ची अनुपस्थिती लोकांना नेहमीच जाणवेल. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले तो क्षण क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहतील.’ असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं आहे.
‘तुमच्या सर्व 765 विकेट खास होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार मिळणे हे दर्शवते की गेल्या काही वर्षांत संघाच्या यशावर तुमचा काय प्रभाव पडला आहे. एकाच सामन्यात शतक झळकावून आणि पाच विकेट्स घेऊन अष्टपैलू क्षमता अनेक वेळा दाखवून दिली. 2021 मध्ये सिडनी येथे खेळलेल्या धाडसी मॅच सेव्हिंग इनिंगसह, बॅटनेही आपण आपल्या देशाला अनेक अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत.’, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.