नवी दिल्ली | बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात वर्ल्ड कप 2023 मधील 38 वा सामना खेळवण्यात येत आहे. श्रीलंकाने या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 280 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात आणखी एक सामना रंगला तो 2 दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंमध्ये. श्रीलंकेचा ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज आणि बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन यांच्यात हा सामना पाहायला मिळाला. मात्र अँजेलो मॅथ्यूज याने शाकिबला आऊट करत हा सामना जिंकला. तसेच अँजेलोने शाकिबचा हिशोबही क्लिअर केला.
शाकिबने श्रीलंकेच्या बॅटिंगदरम्यान 25 व्या ओव्हरदरम्यान अँजेलो मॅथ्युज मैदानात आला. अँजेलोच्या हेल्मेटची स्ट्रीप तुटल्याने त्याने दुसरा हेल्मेट मागवला. मात्र तोवर 2 मिनिटांचा वेळ निघून गेला. या नियमाचा फायदा घेत शाकिबने अपील केली. शाकिबच्या अपिलवर पंचांनी अँजेलोला टाईम आऊट जाहीर केलं. त्यामुळे अँजेलो एकही बॉल न खेळता आऊट झाला. अँजेलोला मैदानाबाहेर जावं लागलं. अँजेलो क्रिकेट इतिहासात अशा पद्धतीने आऊट होणारा पहिला फलंदाज ठरला.
नियमानुसार, विकेट गेल्यानंतर दुसऱ्या फलंदाज 120 सेकंदांच्या आत बॅटिंगसाठी तयार असायला हवा. अँजेलो नियमानुसार वेळेत आला. मात्र हेल्मेटची स्ट्रीप तुटल्याने 120 सेंकदांचा अवधी पूर्ण झाला. हाच धागा धरुन शाकिबने अपील केली आणि अँजेलोला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर याच अँजेलोने शाकिबला आऊट कर वचपा घेतला.
अपना ‘टाईम’ आया
Angelo Mathews’ reply to the Timed Out enforced by Shakib Al Hasan 👀#AngeloMathews #Timedout #SLvsBAN pic.twitter.com/Ao7as2yAzs
— Ajay Ahire (@Ajayahire_cric) November 6, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.