Video : ‘अण्णा हारी..मेका हारी..’ रोहित शर्माने फिल्डिंग करताना सिंहली भाषेत सहकाऱ्याला नेमकं काय म्हणाला?

| Updated on: Aug 07, 2024 | 8:28 PM

श्रीलंकेने भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली. 27 वर्षानंतर टीम इंडियाचा मालिका पराभव झाला आहे. श्रीलंकेने तिन्ही सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. त्यामुळे विजयी धावा करताना भारताची चांगलीच दमछाक झाली.

Video : अण्णा हारी..मेका हारी.. रोहित शर्माने फिल्डिंग करताना सिंहली भाषेत सहकाऱ्याला नेमकं काय म्हणाला?
Image Credit source: Sri Lanka Social Media
Follow us on

श्रीलंकेने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली आहे. टीम इंडियाला तिसऱ्यांदा 250 आतील धावसंख्या गाठता आली नाही. पहिल्या सामन्यात 230, दुसऱ्या सामन्यात 240 आणि तिसऱ्या सामन्यात 248 धावांचं आव्हान मिळालं. पण तिन्ही सामन्यात धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला अपयश आलं. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही धावसंख्या गाठता न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, या मालिकेत रोहित शर्मा वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकलेला नाही. विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुबमन गिल सर्वच फलंदाजीत फेल ठरले. श्रीलंकन गोलंदाजांनी आपल्या फिरकीवर या फलंदाजांना नाचवलं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी आणखी चांगली करावी लागणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत उतरणार आहे. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे.

तिसऱ्या सामन्यात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्याने सर्वोतोपरी प्रयत्न केलं. श्रीलंकेतील सिंहली भाषेत त्याने खेळाडूंना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदर षटक टाकत असताना अण्णा हरी मेका हरी हे वाक्य वापरताना दिसला. याचा अर्थ हे बरोबर आहे असा होता. हे वाक्य स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. इतकंच काय हे वाक्य बोलल्यानंतर त्यालाही हसू आवरलं नाही.

दरम्यान, श्रीलंकेने टीम इंडियासमोर विजयासाठी 248 धावांचं आव्हान ठेवलं. पण भारताचा संपूर्ण संघ 26.1 षटकात 138 धावांवरच गारद झाला. श्रीलंकेने तिसरा वनडे सामना 110 धावांनी जिंकला. यासह भारताने 27 वर्षानंतर वनडे मालिका गमावली आहे. गौतम गंभीरच्या कारकिर्दितील वनडे मालिकेतील हा पहिला पराभव आहे. दिग्गज खेळाडू असूनही टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

श्रीलंका: चारिथ असलंका, अविष्का फर्नांडो, पथुम निसांका, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, सदीरा समराविक्रामा, दुनिथ वेललागे, जेनिथ लियानागे, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे

भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.