भारतीय संघ दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियातील कामगिरीवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित अवलंबून आहे. असं असताना देशांतर्गत रणजी स्पर्धेत आणखी एक युवा तारा चमकला आहे. हरियाणा आणि केरळ यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात हरियाणाच्या अंशुल कंबोजने केरळचं कंबरडं मोडलं. एकाच डावात केरळचे 10 गडी बाद करत एक विक्रम रचला आहे. अंशुल कंबोजने 30.1 षटकात 49 धावा देत 10 विकेट घेतल्या आहेत.
अशी कामगिरी करणार अंशुल हा काही पहिला गोलंदाज नाही. यापूर्वी दोन गेलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. रणजी स्पर्धेत अशी कामगिरी 38 वर्षांनी झाली आहे. 1985-86 च्या पर्वात अशी झाली होती. तर 1956-57 मध्ये पहिल्या दहा विकेट घेण्याचा योग जुळून आला होता. प्रेमंगसु मोहन चटर्जी आणि प्रदीप सुंदरम यांनी हा विक्रम केला होता. आता या यादीत अंशुल कंबोजचं नाव जोडलं गेलं आहे. प्रेमंगसु मोहन चटर्जीने 1956-57, तर प्रदीप सुंदरमने 1985-86 मद्ये अशी कामगिरी केली होती. चटर्जीने बंगालसाठी खेळताना, प्रदीपने राजस्थानसाठी खेळताना अशी कामगिरी केली होती.
1⃣ innings 🤝 1⃣0⃣ wickets 👏
Historic Spell 🙌
3⃣0⃣.1⃣ overs
9⃣ maidens
4⃣9⃣ runs
1⃣0⃣ wickets 🔥Watch 📽️ Haryana Pacer Anshul Kamboj’s record-breaking spell in the 1st innings against Kerala 👌👌#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RcNP3NQJ2y
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 15, 2024
अंशुल फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे, सुभाष गुप्ते आणि देबाशीष मोहंती यांनी अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी तीनदा झाली आहे. इंग्लंडचा जिम लेकर आणि न्यूझीलंडच्या एजाज पटेलने अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून अनिल कुंबळेने अशी कामगिरी केली आहे. कुंबळे पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच डावात विकेट घेतल्या होत्या.
अंशुल कंबोजने 19 फर्स्ट क्लास सामन्यात 50 विकेट घेतल्या आहेत. अंशुल नुकताच एसीसी इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारत ए संघासाठी खेळला. कंबोजने या वर्षी रेड क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अंशुलने आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 3 सामने खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. मात्र यावेळी त्याला रिटेन केलं नाही. त्यामुळे त्याच्यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. त्यात त्याचा फॉर्मही जबरदस्त दिसत आहे.