मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा आज (5 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. विराट प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. विराटसाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने विराटचे तीन फोटो शेअर केले आहेत.
विराट त्याच्या आयुष्यामधील प्रत्येक भूमिका चांगल्याप्रकारे निभावत आहे. माझं तुझ्यासह या जीवनात आणि त्याही पलीकडे आणि अविरतपणे प्रेम आहे, असं अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विराट आणि अनुष्का यांनी 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं होतं. दोघांना दोन वर्षांची मुलगी असून तिचं वामिका असं नाव आहे.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यामध्ये शतक करत सचिन तेंडुलकरच्या विक्रमासोबत बरोबरी केली आहे. विराटने या सामन्यामध्ये नाबाद 101 धावांची खेळी केली. भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करत 326 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये विराटने सर्वाधिक 101 धावा आणि श्रेयस अय्यर 77 धावा केल्या होत्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रकेच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. या विजयासह भारताने पॉईंट टेबलमध्ये आपलं पहिलं स्थानं कायम ठेवलं असून वर्ल्ड कपमध्ये सलग आठवा विजय मिळवला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी