मुंबई : अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून त्याचा टी-20 डेब्यू केला आहे. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो 2018 मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघासाठी डेब्यू करणाऱ्या अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. (Arjun Tendulkar eligible to feature in IPL 2021 auction after Mumbai debut)
पुढील महिन्यात आयपीएल 2021 स्पर्धेसाठी लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात अर्जुन तेंडुलकरचा समावेश होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अर्जुनवर अनेक संघांकडून बोली लावली जाऊ शकते. तसेच त्यांच्यात अर्जुनसाठी चढाओढही पाहायला मिळेल. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुनचा जलवा पाहायला मिळू शकतो.
आयपीएल 2021 स्पर्धेसाठी फेब्रुवारीमध्ये लिलाव होण्याची शक्यता आहे. यंदा दरवर्षीप्रमाणे मोठा लिलाव होणार नाही. यादरम्यान अर्जुन तेंडुलकरला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अजून कमीत कमी दोन सामने खेळण्याची संधी मिळू शकते. या दोन सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन करुन संघात आणि आयपीएलमध्ये संधीसाठी अर्जुन दावेदारी सिद्ध करु शकतो. अर्जुन आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत असायचा. यावेळी तो नेट्समध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसोबत गोलंदाजीचा सराव करायचा.
डेब्यू सामन्यात अर्जुनला चमकदार कामगिरी करता आली नाही
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई विरुद्ध हरियाणा सामन्यात अर्जुनने डेब्यू केला होता. या सामन्यात हरियाणाने मुंबईवर 8 विकेट्सने शानदार विजय (Mumbai vs Haryana) मिळवला. अर्जुनकडून या सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्यानेही निराशा केली. प्रथम बॅटिंग करताना अर्जुन डायमंड डक ( diamond duck) झाला. म्हणजेच एकही चेंडू न खेळता तो रनआऊट झाला. गोलंदाजी करताना त्याने 1 विकेट घेतली. पण त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 पेक्षा अधिकच्या इकोनॉमी रेटने 34 धावा लुटवल्या. तसेच एक कॅचही त्याने सोडला.
जुळून आला योगायोग
टी-20 क्रिकेटमध्ये अर्जुनने हरयाणाविरोधात पदार्पण केलं. यासह एक भन्नाट योगायोग जुळून आला आहे. अर्जुन तेंडुलकरचा पिता आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने डोमेस्टेक क्रिकेटमधील अखेरचा सामना हा हरयाणाविरोधात खेळला होता. तर आता 8 वर्षानंतर अर्जुनने हरयाणाविरोधात पदार्पण केले आहे. यामुळे पिता पुत्रांचा 8 वर्षानंतर हरयाणाविरोधातील योगायोग जुळून आला आहे.
हेही वाचा
Mumbai vs Haryana | अर्जुन तेंडुलकर शून्यावर बाद, गोलंदाजीही चोपली, 3 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस
अर्जून तेंडुलकर मुंबईच्या संघात, पण निवडीवर का वाद?
(Arjun Tendulkar eligible to feature in IPL 2021 auction after Mumbai debut)