आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी अर्शदीप सिंगने उचललं टोकाचं पाऊल, प्रीति झिंटा करणार कारवाई!

| Updated on: Nov 05, 2024 | 8:00 PM

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रिटेन्शन यादी जाहीर झाली आहे. पंजाब किंग्सची रिटेन्शन यादी लक्षवेधी ठरली. कारण पंजाब किंग्सने दोन अनकॅप्ड प्लेयर्संना रिटेन केलं आहे. इतर सर्व खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यानंतर पंजाब किंग्सचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगच्या एका कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी अर्शदीप सिंगने उचललं टोकाचं पाऊल, प्रीति झिंटा करणार कारवाई!
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावापूर्वी 10 फ्रेंचायझींनी रिटेन केल्या 47 खेळाडूंची यादी समोर ठेवली आहे. यात पंजाब किंग्सच्या यादीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण यात फक्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन केलं आहे. त्यांच्यावर फक्त 9.5 कोटी खर्च केले असून 110.5 कोटीसह पंजाब किंग्स मैदानात उतरणार आहे. पण पंजाब किंग्समध्ये अर्शदीपसारखा दिग्गज खेळाडू असूनही रिटेन न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंजाब अर्शदीपसाठी राइट टू मॅच कार्डचा वापर करू शकते. पण याबाबतही साशंकता आहे. कारण, मेगा लिलावापूर्वी क्रिकेटपटू अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवर पंजाब किंग्स अनफॉलो केलं आहे. त्यामुळे फ्रेंचायझी आणि अर्शदीप सिंग यांच्यात बिनसल्याचं दिसत आहे. कारण अर्शदीपने पंजाब किंग्सच नाही तर इंस्टाग्रामवरून पंजाबसाठी केलेली प्रत्येक पोस्ट डिलिट केली आहे. यावरून पंजाब किंग्स आणि अर्शदीप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं दिसत आहे.

रिपोर्टनुसार या महिन्याच्या 24 आणि 25 तारखेला सौदी अरबच्या रियादमध्ये मेगा लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी अर्शदीपने उचलेलं पाऊल पाहता पंजाब किंग्स राईट टू मॅच कार्डचा वापर करेल की शंका आहे. अर्शदीपने 2019 मध्ये पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने पंजाब किंग्ससाठी 65 सामने खेळले असून 76 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयात रिटेन करणं फ्रेंचायझीच्या दृष्टीने योग्य नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्याला रिटेन केलं नाही. लिलावात अर्शदीपला 18 कोटींपेक्षा कमी पैशात खरेदी केलं जाईल अशी तर्क लावला जात आहे. पण या निव्वळ चर्चा असून याबाबत काही तथ्य नाही. दुसरीकडे, अर्शदीपने पंजाब किंग्सला अनफॉलो केल्याने इतर संघाकडून खेळण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2019 मध्ये पंजाब किंग्सने 20 लाखांच्या बेस प्राईसवर घेतलं होतं. त्यानंतर 2020 आणि 2021 मध्ये त्याला 20 लाख हीच किंमत देण्यात आली. 2022 मध्ये 4 कोटी देण्यात आले. तसेच 2023 आणि 2024 आयपीएलमध्ये 4 कोटी रुपये मोजण्यात आले होते. दरम्यान, अर्शदीप सिंग आता कॅप्ड प्लेयर आहे. त्यामुळे त्याचं बजेट वाढलं आहे.