मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेला सुरूवात झाली आहे. 5 कसोटी सामन्यांची मालिका असून पहिला सामना आज सुरू झाला आहे. इग्लंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने 393 धावांवर आपला डाव घोषित केला. यामध्ये जो रूट याने नाबाद 118 धावांची शतकी खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने 78 धावांची अर्धशतकी खेळी केली. या सामन्यामध्ये एक विकेट खूप खतरनाक पडली.
इंग्लंड संघाचा खेळाडू हॅरी ब्रुक खूप वाईट पद्धतीने आऊट झाला. सामन्याच्या 38 व्या ओव्हरमध्ये 32 धावांसह तो मैदानात होता, मोठी खेळी करणार असंच वाटत होतं. मात्र नॅथन लियॉनच्या त्या एका बॉलने त्याचा घात केला.
नॅथन लियॉन चेंडू स्पिन होऊन त्याच्या मांडीला लागला आणि हवेत उडाल. त्यावेळी कांगारूंनी अपील केलं मात्र चेंडू गेलाय कुठं हे सर्वजण पाहत होते. अपील थंडावली चेंडू खाली आल्यावर टप्पा पडून स्टम्पवर जाऊन आदळला. कोणालाच विश्वास बसत नव्हता की ब्रुक इतक्या वाईट पद्धतीने आऊट झाला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रुकने 37 चेंडूत 32 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने चार चौकार मारले होते.
पाहा व्हिडीओ-
Strange – but Nathan Lyon’s not complaining! #Ashes pic.twitter.com/IZCISHJmhm https://t.co/CcnbDx5qFX
— cricket.com.au (@cricketcomau) June 16, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.