ENG vs AUS 4th Test | इंग्लंड पहिल्या डावात 592 वर ऑलआउट, ऑस्ट्रेलियावर मोठी आघाडी

| Updated on: Jul 21, 2023 | 8:11 PM

England vs Australia 4th Test Day 3 | इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात 275 धावांची मोठी आघाडी घेतली. मात्र जॉनी बेयरस्टो दुर्देवी ठरला.

ENG vs AUS 4th Test | इंग्लंड पहिल्या डावात 592 वर ऑलआउट, ऑस्ट्रेलियावर मोठी आघाडी
Follow us on

मँचेस्टर | अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 107.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 592 धावा केल्या. इंग्लंडने यासह पहिल्या डावात 275 धावांची मोठी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 317 धावांच्या प्रत्त्युतरात इंग्लंडकडून एकूण 5 जणांनी अर्धशतक आणि एकाने खणखणीत शतकी खेळी केली. इंग्लंडला या जोरावर 250 अधिक धावांची आघाडी घेता आली.

इंग्लंडकडून ओपनर झॅक क्रॉली याने सर्वाधिक 189 धावा केल्या. या खेळीत झॅकने 182 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 21 फोर ठोकले. बेन डकेट 1 रन करुन आऊट झाला. वनडाऊन मोईन अली याने 54 धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी ओपनर झॅक आणि जो रुट या जोडीने 206 धावांची द्विशतकी भागीदारी केली. मात्र कॅमरुन ग्रीन याने ही जोडी फोडत झॅकला 189 रन्सवर आऊट केलं. त्यानंतर जो रुट 84 धावा करुन आऊट झाला. कॅप्टन बेन स्टोक्स 51, हरी ब्रूक याने 61 धावांची खेळी केली. हॅरी आऊट झाल्याने इंग्लंडची 7 बाद 486 अशी स्थिती झाली.

ऑस्ट्रेलियाने इथून ख्रिस वोक्स याला झिरो आणि मार्क वूड याला 6 धावांवर झटपट आऊट केलं. स्टुअर्ट ब्रॉड हा देखील 7 रन करुन माघारी परतला. मात्र जेम्स जेम्स अँडरसन आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने दहाव्या विकेटसाठी 66 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

या दहाव्या विकेटच्या भागीदारीदरम्यान बेयरस्टो याने तुफान फटकेबाजी करत 90 पार मजल मारली. बेयरस्टो शतकाच्या उंबरठ्यावर होता. मात्र कॅमरुन ग्रीन याने जेम्स अँडरसन याला 5 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यामुळे बेयरस्टोला 99 धावांवर नाबाद परतावं लागलं.

आणि बेयरस्टोचं शतक होता होता राहिलं

ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन आणि मिचेल स्टार्क या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स याने कॅप्टन बेन स्टोक्स याची एकमेव विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन,