Ashes Series 1St Test | उस्मान ख्वाजा याची चिवट खेळी, इंग्लंड विरुद्ध झुंजार शतक

| Updated on: Jun 17, 2023 | 10:29 PM

Usman Khawaja Century | उस्मान ख्वाजा इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत याने शतक ठोकलं. उस्मानच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सावरला.

Ashes Series 1St Test | उस्मान ख्वाजा याची चिवट खेळी, इंग्लंड विरुद्ध झुंजार शतक
Image Credit source: pc | cricketcomau twitterpc
Follow us on

बर्मिंगघम | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस सीरिजमधील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा याने शतक ठोकलंय. उस्मानने 199 बॉलमध्ये 12 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. उस्मानच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण 15 वं तर इंग्लंड विरुद्धचं पहिलवहिलं शतक ठरलं. उस्मानने या शतकासाठी मैदानात तब्बल 293 मिनिटं खर्ची घातली.

उस्मान ख्वाजा याने या शतकासह मोठा बहुमान मिळवलाय. उस्मान अ‍ॅशेस सीरिजमध्ये 2015 नंतर ऑस्ट्रेलियासाठी शतक करणारा पहिला फलंदाज ठरलाय. ऑस्ट्रेलियाकडून याआधी क्रिस रोजर्स याने 2015 मध्ये शतक ठोकलं होतं.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाने 393 धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात आतापर्यंत एकूण 5 विकेट्स गमावल्या आहेत. कॅमरुन ग्रीन याने 38 धावा केल्या. ट्रेव्हिस हेड 50 धावा करुन बाद झाला. स्टीव्हन स्मिथ याने 16 धावांची खेळी केली. ओपनर डेव्हिड वॉर्नर 9 धावा केल्या. तर कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज मार्नस लाबुशेन याला भोपळाही फोडता आला नाही.

उस्मान ख्वाजा याचं शतक

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने 78 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 393 रन्सवर इनिंग डिक्लेअर केल्याने क्रिकेट चाहत्यांना एकच झटका लागला. इंग्लंडकडून जो रुट याने सर्वाधिक 118 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याने 4 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडकडून झॅक क्रॉली याने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. डकेट 12 धावांवर आऊट झाला. ओली पोप 31 धावांवर नेथन लायनचा शिकार झाला. हॅरी ब्रूकने 32 धावा जोडल्या. कॅप्टन बेन स्टोक्स सपशेल अपयशी ठरली. स्टोक्स अवघी 1 धाव करुन बाद झाला. विकेटीकीपर बॅट्समन जॉनी बेयरस्टो याने 78 धावांचं योगदान दिलं. निवृत्तीवरुन माघार घेतल्या मोईन अली 18 रन्स करुन तंबूत परतला. स्टुअर्ट ब्रॉडने 16 रन्स केल्या. तर रॉबिन्सन याने 17 धावांची नाबाद खेळी केली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.