बर्मिंगघम | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या अॅशेस सीरिजला आज 16 जूनपासून सुरुवात झाली. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याचं आयोजन हे एजबस्टन बर्मिंगघम इथे करण्यात आलं आहे. या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने शतक ठोकत शानदार सुरुवात केली आहे. रुटचं कसोटी कारकीर्दीतील हे 30 वं शतक ठरलं आहे. इंग्लंडने पहिला डाव 393 धावांवर घोषित केला. तोवर रुटने 118 धावा केल्या होत्या.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडला आश्वासक सुरुवातीची अपेक्षा होती, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तसं काही होऊ दिलं नाही. पाचव्या विकेटचा अपवाद वगळता ऑस्ट्रलियाने इंग्लंडला ठराविक अंतराने झटके दिले. इंग्लंडने पाचव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. इंग्लंडकडून कॅप्टन बेन स्टोक्स अवघ्या 1 धावेवर बाद झाला. स्टोक्सचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र जो रुट याचा अपवाद वगळता एकालाही त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही.
जो रुट याचं शतक
Test century No. 3⃣0⃣ for Joe Root ?#Ashes | #WTC25 | ?: https://t.co/ZNnKIn9jeq pic.twitter.com/OhEK67TsGQ
— ICC (@ICC) June 16, 2023
इंग्लंडकडून जो रुट याने 152 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद सर्वाधिक 118 धावा केल्या. तर झॅक क्रॉली आणि विकेटकीपर जॉनी बेयरस्टो या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. बेयरस्टो याने 78 तर झॅकने 61 धावा केल्या. हॅरी ब्रूकने 32 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ओली पॉप याने 31 धावांचं योगदान दिलं. तर डकेट याने 12, स्टुअर्ट ब्रॉड 16, रॉबिन्सन 17* आणि मोईन अली याने 18 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडने 2 फलंदाजांना आऊट केलं. बोलँड आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.