लंडन | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा क्रिकेटची पंढरी असेलल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीचा हा आजचा (28 जून) पहिलाच दिवस आहे. इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर सलामी जोडी मैदानात आली. सामन्याला सुरुवात झाली. सामन्याला सुरुवात होताच काही ओव्हर्सनंतर एकच खळबळ उडाली. मैदानात असं काही झालं की काही सेकंदांमध्ये हे विषय सोशल माीडियावर व्हायरल झालं.
सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित असलेले काही जण खेळाडूंच्या दिशेने धावत गेले. या सर्व प्रकारामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला. मैदानात धावून गेलेले काही जण हे क्रिकेट चाहते असल्याचा अंदाज बांधण्यात आला. मात्र नंतर सर्व समोर आलं. क्रिकेटपटूंच्या दिशेने धावत गेलेले हे काही जण क्रिकेट चाहते नसून आंदोलनकर्ते असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जॉनी बेयरस्टो याने आंदोलनकर्त्याला थांबवलं
Jonny Bairstow stopping Oil protesters.
What a crazy scenes at Lord's.pic.twitter.com/jFWsE0MLzo
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 28, 2023
‘जस्ट स्टॉप ऑईल’ या आंदोलनाचे पडसाद या सामन्यात पाहायला मिळाले. जस्ट स्टॉप ऑईल या आंदोलनात सहभागी असणारे काही सदस्य हे मैदानात घुसले आणि धावत खेळाडूंच्या दिशेने गेले. यावेळेस या आंदोलकांची आणि खेळाडूंमध्ये झटापट झाल्याचं समजतंय. तसेच या आंदोलकांकडे पावडर असल्याचंही म्हटलं जात आहे. या प्रकरणामुळे क्रिकेटपटूंची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचंच स्पष्ट होतंय.
मैदानात धावत आलेल्या आंदोलकाला इंग्लंडचा विकेटकीपर जॉनी बेयरस्टो याने उचललं. त्याला उचलून थेट बाऊंड्री लाईनच्या बाहेर ठेवलं.
यूके अर्थात युनायटेड किंगडममध्ये पर्यावरणवाद्यांचा एक गट आहे. या गटाची ‘जस्ट स्टॉप ऑईल’ अशी ओळख आहे. ब्रिटिश सरकारने तातडीने, तेल, गॅस आणि कोळसा प्रकल्प थांबवायला हवीत, अशी या आंदोलकांची मागणी आहे. ब्रिटिश सरकारला तेलाचं लायसन्स देण्यापासून रोखायचं, असं या गटाचा उद्देश आहे. या आंदोनाची सुरुवात मे 2022 पासून झाली. या पर्यावरणवाद्यांनी गेल्यावर्षी अनेक आंदोलनं केली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.