ENG vs AUS 5th Test | इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड याला विजयी निरोप, ऑस्ट्रेलियावर 49 रन्सने मात

| Updated on: Jul 31, 2023 | 11:24 PM

Ashes 2023 England vs Australia 5th Test | इंग्लंडच्या गोलंदाजांनी धमाकेदार कमबॅक करत पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 49 धावांनी विजय मिळवला आहे.

ENG vs AUS 5th Test | इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड याला विजयी निरोप, ऑस्ट्रेलियावर 49 रन्सने मात
Follow us on

लंडन | इंग्लंड क्रिकेट टीमने अ‍ॅशेस सीरिजमधील पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर 49 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधत ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यापासून रोखलं. तसेच इंग्लंडने स्टुअर्ट ब्रॉड याला विजयी निरोपही दिला आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 334 धावांवर ऑलआऊट झाली.

ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि अंतिम दिवशी लंच ब्रेकपर्यंत 3 विकेट्स गमावून 238 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 146 धावा हव्या होत्या. तर हातात 7 विकेट्स होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा वाटत होता. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुपर कमबॅक केलं. लंचनंतर पाऊस झाला. या पावसाने गेमच फिरवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला 334 धावांवर रोखलं.

हे सुद्धा वाचा

इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर विजय

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बॅन डकॅट, झॅक क्राउली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि टॉड मर्फी.