Test Series | टीमला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून ‘आऊट’

| Updated on: Jul 03, 2023 | 7:28 PM

Test Cricket | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीमचा अनुभवी खेळाडू हा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

Test Series | टीमला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू  कसोटी मालिकेतून आऊट
Follow us on

मुंबई | क्रिकेट टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. टीम इंडिया या कसोटी मालिकेत एकूण 2 सामने खेळणार आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर वनडे आणि टी 20 मालिका पार पडणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे मॅचविनर खेळाडू हा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीमचं टेन्शन दुप्पटीनं वाढलंय.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायन याला अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीनंतरही नाथन बॅटिंगसाठी मैदानात आला. नाथनच्या या दुखापतीवर मेडिकल टीम लक्ष ठेवून होती. मात्र अखेर ज्याची भीती होती तेच झालं. नाथनला दुखापतीमुळे आता इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मात्र नाथनच्या दुखापतीमुळे कांगारुंना मोठा फटका बसलाय.

नाथन लायन मालिकेतून ‘आऊट’

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला. नाथनला या सामन्यातील दुसऱ्या दिवशी फिल्डिंग दरम्यान 37 व्या ओव्हरदरम्यान ही दुखापत झाली. त्यामुळे नाथनला दुखापतीमुळे बॉलिंगही करता आली नाही. यानंतर नाथन लंगडत मेडिकल टीमच्या मदतीने मैदानाबाहेर पडला.
नाथन या दुखापतीनंतर कुबड्यांच्या आधारे चालतान दिसला. मात्र नाथनने हार मानली नाही. नाथनने सामन्यातील तिसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी बॅटिंग केली. नाथनच्या या स्पिरिटचं क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केलं.

दुसऱ्या सामन्याचा धावता आढावा

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 43 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडकडून 371 धावांचा शानदार पद्धतीने पाठलाग करण्यात येत होता. इंग्लंड कॅप्टन बेन स्टोक्स ऑस्टेलियाला वन मॅन शो भिडला होता. बेन स्टोक्स कसोटीत वनडे स्टाईल बॅटिंग करत होता. त्यामुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र बेन स्टोक्स 155 धावांवर आऊट झाला. स्टोक्सनंतर एकाही बॅट्समन विजयी खेळी साकारता आला नाही. स्टोक्सची 155 धावांची खेळी अवघ्या 43 धावांमुळे वाया गेली.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 81.3 ओव्हरमध्ये 327 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे इंग्लंडचा 43 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान तिसरा कसोटी सामना हा आता 6 ते 10 जुलै दरम्यान हेडिंग्ले लीड्स इथे खेळवण्यात येणार आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जिमी पियरसन (विकेटकीपर), टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, स्कॉट बोलँड आणि मायकल नेसर.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम

बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉउली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.