Ashes Series 2023 3rd Test | तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन जाहीर, मोठा खेळाडू ‘आऊट’

| Updated on: Jul 05, 2023 | 6:50 PM

England vs Australia 3rd Ashes Test 2023 | बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड अ‍ॅशेस मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे.

Ashes Series 2023 3rd Test | तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन जाहीर, मोठा खेळाडू आऊट
Follow us on

हेडिंग्ले | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस सीरिज 2023 खेळवण्यात येत आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा सामना हा गुरुवार 6 जुलै ते सोमवार 10 जुलै दरम्यान हेडिंग्ल लीड्स इथे खेळवण्यात येणार आहे. या तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 मोठे बदल केले आहेत. इंग्लंड क्रिकेटने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

इंग्लंडमध्ये 3 बदल

हे सुद्धा वाचा

इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोईन अली, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. तर ओली पोप, जोश टंग आणि अनुभवी गोलंदाज जेम्स एंडरसन या तिघांना वगळलंय. एंडरसनला वगळल्याने क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. जोश टंग आणि एंडरसन या दोघांना तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा अखेर ठरली. तर ओली पोप हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे.

ओली पोप दुखापतीमुळे ‘आऊट’

इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर पराभूत व्हावं लागलं. ओली पोप याला दुसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवशी फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. पोप या दुखापतीमुळे पोप उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे.

मोईल अलीची एन्ट्री

मोईन अली ऑस्ट्रेलिया विरुद्ध या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला होता. मात्र मोईनला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. पण मोईनने टीममध्ये कमबॅक केलं.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम

बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जिमी पीयरसन (विकेटकीपर), टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, स्कॉट बोलैंड आणि मायकल नेसर.