Ashes 2023, ENG vs AUS 5th Test | ऑस्ट्रेलियाला टफ फाईट देण्यासाठी इंग्लंड प्लेईंग इलेव्हन जाहीर, या खेळाडूंना संधी

| Updated on: Jul 27, 2023 | 2:34 AM

England vs Australia 5th Test Ashes 2023 | इंग्लंड क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.

Ashes 2023, ENG vs AUS 5th Test | ऑस्ट्रेलियाला टफ फाईट देण्यासाठी इंग्लंड प्लेईंग इलेव्हन जाहीर, या खेळाडूंना संधी
Follow us on

लंडन | अ‍ॅशेस सीरिज 2023 मधील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा गुरुवार 27 जुलै ते सोमवार 31 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचं आयोजन हे केनिंग्टन ओव्हल इथे करण्यात आलंय. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. इंग्लंड क्रिकेट टीमने या पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी 24 जुलै रोजी 14 सदस्यीय संघाची ट्विट करत घोषणा केली होती. तर आता सामन्याच्या पूर्वसंध्येला क्रिकेट बोर्डाने प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड टीमने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जेम्स एंडरसन याला टीममध्ये कायम ठेवण्यात आलंय. एंडरसनसारख्या अनुभवी गोलंदाजाला या प्रतिष्ठेच्या मालिकेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं.

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन

हे सुद्धा वाचा

मालिकेत आतापर्यंत काय घडलं?

ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे अ‍ॅशेस सीरिज ऑस्ट्रेलियाकडे राहणार हे स्पष्ट झालं आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यांत पहिला सामना हा बर्मिंगघम इथे खेळवण्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यातही ही लय कायम राखली. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली. यानंतर लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पाणी पाडलं. ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली.

सलग 2 सामने गमावल्याने इंग्लंडचं टेन्शन प्रचंड वाढलेलं. इंग्लंडसाठी तिसरा कसोटी सामना हा आरपारचा झाला होता. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय हवाच होता. त्यानुसार इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला बॅक पुटलवर टाकत 3 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह मालिकेतील खातं उघडलं. त्यामुळे इंग्लंडची 1-2 अशी स्थिती झाली.

चौथा सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवण्याता आला. सामना चौथ्या दिवसापर्यंत रंगतदार स्थितीत होता. त्यामुळे पाचव्या दिवसाबाबत क्रिकेट चाहत्यांना सामना सुरु होण्याची प्रतिक्षा होती. सामन्यात इंग्लंड चांगल्या स्थितीत होती. यामुळे इंग्लंड विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात होती. मात्र पावसाला ते मान्य नव्हतं.

पाचव्या दिवशी एकही बॉल टाकण्यात आला नाही. अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सामना ड्रॉ झाला. त्यामुळे इंग्लंडचे मालिका जिंकण्याच्या प्रयत्नाला सुरंग लागला. तर ऑस्ट्रेलियाने मालिका कायम राखली. त्यामुळे आता पाचवा सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत राखण्याच्या तयारीने इंग्लंड टीम मैदानात उतरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बॅन डकॅट, झॅक क्राउली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.

अ‍ॅशेस सीरिजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड टॉड मर्फी, स्कॉट बोलँड, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर आणि जोश इंग्लिश.