लंडन | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या सलग दोन सामन्यांमधील पराभवानंतर इंग्लंड तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. यानतर इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायन याच्यानंतर इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. इंग्लंडचा ओली पॉप याला दुखापत झाली आहे.
ओली पॉप याला दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. ओली पोप याच्या खांद्याला दुखापत झाली. ओली पोप यानंतरही फिल्डिंग करत होता.इतकंच नाही तर ओली पोपने दोन्ही डावात बॅटिंगही केली. मात्र दुसऱ्या डावातील बॅटिंगदरम्यान ओली पोपला आणखी त्रास जाणवू लागला.
बेन स्टोक्स (कॅप्टन), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉउली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.
पॅट कमिन्स (कप्तान), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्कस हैरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जिमी पीयरसन (विकेटकीपर), टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, स्कॉट बोलैंड और माइकल नेसर.