लंडन | ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2 जुलै रोजी अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात इंग्लंडला दुसऱ्या दुसऱ्यांदा पराभवाची धुळ चारली. कांगारुंनी या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. आता या मालिकेतील तिसरा सामना हा 6 जुलै ते 10 जुलै रोजी हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने मालिकेत पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी तिसरा सामना निर्णायक आणि महत्वपूर्ण असणार आहे. इंग्लंडने या तिसऱ्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
इंग्लंड टीममध्ये मोठा बदल झालेला नाही. मात्र 2 खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. मॅटी पॉट्स आणि रेहान अहमद बाहेर पडले आहेत. तिसऱ्या सामन्याआधी प्रमुख खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. इंग्लंडचा स्टार बॅट्समन ओली पोप याला खांद्याची दुखापत आहे. ओली पोप खांद्यावर आवश्यक ते उपचार घेणार आहे. तर मोईन अली याला अजूनही अंगठीच्या दुखापतीचा त्रास सहन करावा लागतोय.
रेहान अहमद याला मोईल अली याच्या जागी दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र रेहानला हेडिंग्ले इथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून टीममधून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे मोईन अली तिसऱ्या सामन्यात दुखापतीनंतर कमबॅक करण्याची शक्यता आहे. तर पोपला दुसऱ्या सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. पोप या दुखापतीतून सावरुन तिसऱ्या कसोटीत खेळेल असा विश्वास टीम मॅनेजमेंटला आहे.
We've named a 15-strong squad for the third #Ashes Test ?
— England Cricket (@englandcricket) July 2, 2023
दरम्यान प्लेइंग इलेव्हनमधून ओली पोप आऊट झाला तर त्याच्या जागी डॅन लॉरेन्स याचा संधी मिळू शकते.
बेन स्टोक्स (कॅप्टन), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉउली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जिमी पियरसन (विकेटकीपर), टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, स्कॉट बोलँड आणि मायकल नेसर.