मँचेस्टर | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवारी 19 जुलैपासून सुरुवात होणार आहे. ही अॅशेस मालिका एकूण 5 सामन्यांची आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे. आतापर्यंत पार पडलेल्या 3 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने सलग आणि पहिले 2 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने तिसरा सामना जिंकून जोरदार कमबॅक केलंय. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने चौथा सामना हा महत्वाचा आहे.पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. आपण या चौथ्या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टेस्टला भारतीय वेळेनुसार 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा मॅन्चेस्टर इथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
दरम्यान इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव एपवर पाहता येईल. तसेच सामन्यातील महत्वाचे अपडेट्स टीव्ही9 मराठी या वेबसाईटवरुन जाणून घेता येतील.
पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड.
बेन स्टोक्स (कॅप्टन) , बेन डकेट, मोईन अली, झॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जोनाथन बॅरिस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स एंडरसन.