मुंबई : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंडला अवघ्या 7 धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात इंग्लंडने 8 गडी गमवून 393 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 386 धावा केल्या. इंग्लंडला अवघ्या 7 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात इंग्लंडला उस्मान ख्वाजाने चांगलंच झुंजवलं. 321 चेंडूत त्याने 14 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 141 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत पोहोचली आहे. उस्मान ख्वाजा काही करून बाद करण्यासाठी बेन स्टोक्सची धडपड सुरु होती. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होते. अखेर कर्णधार बेन स्टोक्सने ब्रुमरेला रणनिती आखत उस्मान ख्वाजाला जाळ्यात ओढलं.
बेन स्टोक्सने लेग साईडला ओली पोप, हॅरी ब्रूक आणि जेम्स अँडरसनला क्षेत्ररक्षणासाठी उभं केलं. अगदी त्याच्या विरुद्ध बाजूनला ऑफ साईडला आरशात बघावं असं जो रूट, स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स स्वत: उभा राहीला. छत्रीचं चित्र जसं असतं अगदी तशी फिल्डिंग त्याने लावली. यावेळी समालोचन करणाऱ्या केविन पीटरसनने ब्रुमरेला असा या फिल्डिंगचा उल्लेख केला.
The dismissal of Usman Khawaja.
A great tactical move to get the well settled Khawaja. pic.twitter.com/y5EJ14qYGj
— Johns. (@CricCrazyJohns) June 18, 2023
बेन स्टोक्सच्या या रणनितीचा ख्वाजावर परिणाम दिसून आला. रॉबिनसनने त्याला यॉर्कर चेंडू टाकला. हा चेंडू खेळताना उस्मान ख्वाजाचा अंदाज चुकला आणि त्याचा त्रिफळा उडाला. विकेट गेल्यानंतर माजी कर्णधार इऑन मॉर्गन समालोचन करताना म्हणाला की, “अखेर प्लान यशस्वी ठरला.”
उस्मान ख्वाजा बाद होताच ऑस्ट्रेलियाचा सात गडी बाद झाले. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ 372 धावांवर होता. त्यानंतर तीन गडी झटपट बाद झाले. 14 धावांवर ऑस्ट्रेलियाचे तीन गडी तंबूत परतले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली रॉबिनसनने प्रत्येकी 3 गडी बाद केले. मोईन अलीने 2, जेम्स अँडरसन आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्येकी एक गडी बाद केला.
इंग्लंडचा संघ : झॅक क्रावले, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ओली रॉबिनसन, जेम्स अँडरसन
ऑस्ट्रेलियाचा संघ : डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, अलेक्स करे, पॅट कमिन्स,नाथन लायन, स्कॉट बोलंड, जोश हेझलवूड