लीड्स | ऑस्ट्रेलियाने इंग्लंड क्रिकेट टीमला तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी 251 धावांचे आव्हान दिले आहे. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 27 धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली 9 आणि बेन डकेट 19 धावांवर नाबाद परतले. त्यामुळे आता इंग्लंडला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी 224 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने या 5 सामन्यांच्या मालिकेतील सलग दोन्ही सामने जिंकले आहेत. इंग्लंड मालिकेत 0-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडवर या तिसऱ्या सामन्यात प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा तिसरा सामना ‘करो या मरो’ असा आहे.
इंग्लंडला विजयासाठी विजयासाठी आणखी 224 धावांची गरज
A rain-hit day at Headingley, but the Test match is well and truly on ?#WTC25 | #ENGvAUS ?: https://t.co/CIqx6cW10r pic.twitter.com/QQCy8EiLet
— ICC (@ICC) July 8, 2023
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
Australia all out for 2️⃣2️⃣4️⃣…
We need 2️⃣5️⃣1️⃣ to win ???????
LET'S DO THIS! ? #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/L37QU61spQ
— England Cricket (@englandcricket) July 8, 2023
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 4 बाद 116 धावसंख्येपासून केली. पावसामुळे अनेक तासांचा खेळ वाया गेला. मात्र अनेक तासांनी पावसाने विश्रांती घेतली. सामना सुरु झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 224 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 251 धावांचं आव्हान मिळालं. त्याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 तर इंग्लंडने 237 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 77 धावा केल्या. उस्मान ख्वाजा याने 43, मार्नस लाबुशेन 33 आणि मिचेल मार्श याने 28 धावा केल्या. मिचेल स्टार्क 18 आणि टॉड मर्फी 11 धावा करुन तंबूत परतले. तर एलेक्स कॅरी, स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅरी 5, स्मिथ 2 आणि वॉर्नर 1 धावांवर आऊट झाले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर मोईन अली आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवलं.
दरम्यान तिसरी कसोटी निर्णायक वळणावर आहे. ऑस्ट्रेलियाला मालिका विजयासाठी चौथ्या दिवशी 10 विकेट्सची गरज आहे. तर इंग्लंडचा सामना जिंकत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी कोण सरस ठरणार हे पुढील काही तासात स्पष्ट होईल.
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.