मुंबई : राजस्थान रॉयल्सनं (RR) आयपीएल (IPL 2022) च्या 63 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी पहिले केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा केल्या. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर 6 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. यशस्वीनं 29 चेंडूत 46 धावा, कर्णधार संजू सॅमसनने 24 चेंडूत 32 धावा केल्या. पडिकलने 18 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली. पराग 17 धावा करू शकला. नीशमने 14 धावा केल्या. बोल्ट सतरा धावांवर नाबाद राहिला. लखनौचे 12 सामन्यांतून 16 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. या सामन्यातील विजय लखनौला प्लेऑफमध्ये घेऊन जाईल, तर पराभव झाल्यास त्यांना शेवटचा सामना पुन्हा जिंकावा लागेल. रॉयल्सच्या संघानेही विजयाची नोंद केली, तर ते अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतील. दरम्यान, या सामन्यात अश्विननं एक चुक केलीय.
इनिंग ब्रेक
Innings Break!
A solid all-round show with the ball from @LucknowIPL. ? ?@ybj_19, @devdpd07 & captain @IamSanjuSamson guided @rajasthanroyals to 178/6. ? ?
Will #LSG chase down the target? ? ?
Scorecard ? https://t.co/9jNdVD6NoB #TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/Z8Tfyk7G9S
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
अठराव्या षटकात एक गडबड झाल्याच पहायला मिळालं. जिमी निशॅमला रनआऊट होऊन माघारी जावे लागले. आर अश्विनमुळे हा घोळ झाला आणि मौदानावरील हा प्रकार पाहून त्याची पत्नी प्रिथी नारायणन हिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसून आले.
अश्विनच्या पत्नीची रिअॅक्शन, Video पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Breakthrough for @rajasthanroyals! ? ?
A sharp catch from @JimmyNeesh as Trent Boult strikes. ? ?#LSG lose Quinton de Kock.
Follow the match ? https://t.co/9jNdVD6NoB#TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/F6QYxneQ5R
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
आवेशने बळीचा बकरा बनवताना त्रिफळा उडवला. राजस्थानचा स्फोटक सलामीवीर जोस बटलरलाही या सामन्यात काही आश्चर्यकारक करता आले नाही आणि तो स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेशने बटलरला बोल्ड केलं. बटलर सहा चेंडूत केवळ दोन धावा करू शकला. यावेळी आवेशच्या चांगलीच चर्चा रंगली.
आवेशची जोरदार गोलंदाजी, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जिमी नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, आवेश खान, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई