Asia Cup 2022: केएल राहुल, विराटकडे हाँगकाँगविरुद्ध जिंकण्याची सुवर्ण संधी, हा फॉर्म्यूला वापल्यास विजय निश्चित, जाणून घ्या..

| Updated on: Aug 30, 2022 | 7:11 PM

हाँगकाँगविरुद्धचा सामना विराट कोहलीच्या फलंदाजीच्या सरावासाठीही चांगला ठरेल जेणेकरून तो पुन्हा लयीत येऊ शकेल. पाकिस्तानविरुद्ध विशेष काही करू न शकलेल्या रोहितकडूनही चांगली खेळी खेळण्याची अपेक्षा असेल. वाचा...

Asia Cup 2022: केएल राहुल, विराटकडे हाँगकाँगविरुद्ध जिंकण्याची सुवर्ण संधी, हा फॉर्म्यूला वापल्यास विजय निश्चित, जाणून घ्या..
केएल राहुल, विराटकडे हाँगकाँगविरुद्ध जिंकण्याची सुवर्ण संधी
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला भारतीय क्रिकेट संघ (Team India) बुधवारी हाँगकाँगविरुद्ध आशिया चषक स्पर्धेतील दुसऱ्या आणि अंतिम साखळी सामन्यात आपल्या फलंदाजीचा क्रम किंवा संघ रचना बदलू शकतो. केएल राहुलसारख्या (KL Rahul) फलंदाजांसाठीही लयीत परतण्याची ही सुवर्णसंधी असेल. रोहित शर्माच्या संघासाठी, अ गटातील हा सामना निव्वळ सरावापेक्षा जास्त नसेल कारण हाँगकाँग संघात भारत आणि पाकिस्तान वंशाचे खेळाडू आहेत जे कदाचित या दोन देशांच्या प्रथम श्रेणी संघांमध्येही स्थान मिळवू शकणार नाहीत. हार्दिक पांड्याच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानला शेवटच्या षटकात पराभूत केल्यानंतर आता फलंदाजीच्या सरावावर सर्वांचे लक्ष असेल.

कशावर भर असणार

राहुलने यावर्षीचा पहिला टी-20 सामना शेवटच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्याला फलंदाजीच्या सरावावर भर द्यायला आवडेल. 65 चेंडूत नाबाद 90 सारख्या स्कोअरपेक्षा टी-20 मध्ये 20 चेंडूत 45 धावा महत्त्वाच्या असतात. डाव कसा खेळला गेला आणि सामन्यातील त्याचे महत्त्व यावर भर दिला जाणार आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी योग्य संघ संयोजनावरही भारताची नजर आहे. हाँगकाँगकडे पाकिस्तानसारखे गोलंदाज नाहीत पण अज्ञात संघाच्या कामगिरीचा अंदाज लावता येत नसल्याने त्यांना हलके घेता येणार नाही. कर्णधार रोहितने हे प्रयोग सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे फलंदाजी क्रमवारीत झालेला बदल आश्चर्याची गोष्ट नाही.

विराटकडे विशेष लक्ष

हा सामना विराट कोहलीच्या फलंदाजीच्या सरावासाठीही चांगला ठरेल जेणेकरून तो पुन्हा लयीत येऊ शकेल, ज्यामुळे विरोधी संघ त्याच्यावर दबले आहेत. पाकिस्तानविरुद्ध विशेष काही करू न शकलेल्या रोहितकडूनही चांगली खेळी खेळण्याची अपेक्षा असेल. रवींद्र जडेजा चौथ्या क्रमांकावर फेकला जातो की दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळते हे पाहायचे आहे.

हे सुद्धा वाचा

रणनीतीची खरी कसोटी

पाकिस्तानी संघात शाहीन शाह आफ्रिदीची अनुपस्थिती असूनही भारतीय शीर्ष फळी फार काही करू शकली नाही. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारख्या संघांविरुद्ध भारताच्या सुरुवातीपासूनच्या आक्रमणाच्या रणनीतीची खरी कसोटी असेल. या सामन्यात युझवेंद्र चहल आणि जडेजा यांना विश्रांती देऊन रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांना मैदानात उतरवले जाऊ शकते.

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हान जाणून घ्या….

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

हाँगकाँग : निजाकत खान (कर्णधार), किंचित शाह, आफताब हुसैन, एजाज खान, अतीक इक्बाल, बाबर हयात, धनंजय राव, एहसान खान, हारून अर्शद, स्कॉट मॅकेनी, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वाहिद, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी, वाजिद शाह , यासीम मुर्तझा, झीशान अली.