Pakistan Cricket Team | सुपर 4 मधील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन जाहीर

| Updated on: Sep 06, 2023 | 12:23 AM

Pakistan vs Bangladesh Super 4 Asia Cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेतील पहिला टप्पा पार पडला आहे. साखळी फेरीनंतर आता सुपर 4 फेरीचा थरार रंगणार आहे.

Pakistan Cricket Team | सुपर 4 मधील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन जाहीर
भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता श्रीलंका आणि भारतामध्ये फायनल सामना होणार आहे.
Follow us on

लाहोर | श्रीलंका क्रिकेट टीमने आशिया कप 2023 मधील अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर 2 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. श्रीलंकाने या विजयासह सुपर 4 मध्ये प्रवेश केला. सुपर 4 फेरीला बुधवार 6 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सुपर 4 मधील पहिला सामना हा पाकिस्तानचा असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमने या सुपर 4 मधील पहिल्या सामन्यासाठी आपली प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्यांच्या काही तासांआधीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

टीममध्ये एकमेव बदल

पाकिस्तान टीमने प्लेईंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. टीममध्ये मोहम्मद नवाझ याच्या जागी फहीम अश्रफ या बॉलिंग ऑलराउंडरला संधी दिली आहे. मोहम्मद नवाझ याने टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात 8 ओव्हर बॉलिंग केली. नवाझने या 8 ओव्हरमध्ये 6.90 च्या इकॉनॉमीने 55 धावा दिल्या. तर एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे टीमने त्याला प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने

सुपर 4 मधील पहिला सामना हा बुधवारी 6 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान (A1) विरुद्ध बांगलादेश (B2) आमनेसामने असणार आहे. पाकिस्तानने या सामन्यासाठी काही तांसाआधी आपल्या 11 खेळाडूंची नाव घोषित केली आहेत. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

आशिया कप 2023 साठी टीम बांगलादेश |  शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे 11 शिलेदार

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन |बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.