मुंबई : आशिया कप 2023 मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये खरा हाय-व्होल्टेज सामना झाला. अफगाणिस्तान संघाचा या सामन्यामध्ये अवघ्या 2 धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये झालेल्या निसटत्या पराभवामुळे अफगाणिस्तान संघाचं सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं. फक्त दोन धावांनी पराभव झाल्याने संघातील खेळाडूला जिव्हारी लागलाय. सामन्यात टीम व्यवस्थापनाने गणिताकडे लक्ष्य दिलं नाही. कारण अफगाणिस्तानच्या खेळाडूंना आणि स्टाफला एक गोष्ट माहित नव्हती की सुपर साठी पात्र व्हायचं असेल तर त्यांना श्रीलंकेने दिलेलं 292 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. त्यामुळे सामना फिरला आणि अफगाणिस्तानला विजयही मिळवता आला नाही.
38 व्या ओव्हमध्ये धनंजय डी सिल्वा याच्या बॉलिंगवर मुजीबने मोठा फटका खेळला. मात्र तो कॅच आऊट झाला. त्यावेळी सर्वांना वाटला सामना गेला पण सामना त्यांच्याच हातात होता. आता तो कसा तर जर मुजीब याने 38 व्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर एक धाव घेत राशिद खानला स्ट्राईक दिली असती आणि दुसऱ्या बॉलवर राशिदने चौकार आणि सिक्सर मारत सामना जिंकवला असता. या विजयासह अफगाणिस्तानचा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला असता.
दरम्यान, मुजीब उर रहमान झिरोवर आऊट झाला. त्यानंतर फझलहक फारुकी स्ट्राईकवर आला. तर सेट राशिद खान स्ट्राईक एंडवर होता. राशिदला स्ट्राईक हवी होती. मात्र धनंजय डी सील्वहा याने फझलहक फारुकी याला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं आणि अफगाणिस्तानचा संघ ऑल आऊट झाला.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना