मुंबई : आशिया कप स्पर्धेतून नेपाळचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर नेपाळला 10 विकेट्सने पराभूत करत भारताने सुपरमध्ये एन्ट्री मारली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने नेपाळला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. नेपाळनं सर्वबाद 230 धावा केल्या. मात्र पावसाने हजेरी लावल्याने हा सामना उशिराने सुरु झाला. त्यामुळे टीम इंडियासमोबर 23 षटकात 145 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने एकही गडी न गमवता पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 145 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा याने 74 आणि शुबमन गिल याने 67 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुरने एक गडी बाद केला.सुपर 4 मध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानशी भिडणार आहे.
“सलामीवीरांनी आमच्यासाठी चांगली कामगिरी केली. आम्हाला 30 धावा कमी पडल्या आणि जर मधल्या फळीने चांगली कामगिरी केली असती तर आम्ही 260-270 पर्यंत पोहोचू शकलो असतो. आमची खालची फळी गेल्या 4-5 महिन्यांत उत्तम काम करत आहे आणि योगदान देत आहे. परिस्थिती खरोखरच कठीण होती पण चेंडू पकडीत बसत नसूनही आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.”, असं नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल याने सांगितलं.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी