Asia Cup मधील ind-pak सामन्याआधी टीमसाठी वाईट बातमी, ज्याची भीती तेच झालं!

| Updated on: Aug 28, 2023 | 6:21 PM

Ind vs Pak : भारत-पाकिस्तानमधील महामुकाबला 2 ऑगस्टला पार पडणार आहे मात्र त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. ज्याची भीती सर्वांनाच होती तेच घडलं आहे परंतु अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही.

Asia Cup मधील ind-pak सामन्याआधी टीमसाठी वाईट बातमी, ज्याची भीती तेच झालं!
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 ला सुरू व्हायला अवघे चार दिवस बाकी असून सर्व संघांनी जोरदार तयारी केलेली आहे. पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया कपचं यजमानपद आहे. मात्र बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे इतर सामने श्रीलंकेमध्ये होणार आहे. भारत-पाकिस्तानमधील महामुकाबला 2 सप्टेंबरला पार पडणार आहे मात्र त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. ज्याची भीती सर्वांनाच होती तेच घडलं आहे परंतु अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही.

नेमकं काय झालंंय?

आशिया कपआधी टीम इंडियाचं सराव शिबिर सुरू आहे. आशिया कप साठी निवड झालेले खेळाडू या सराव शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये काही गोलंदाजांना नेट बॉलर म्हणूनही बोलावून घेतलं आहे. सर्व खेळाडूंची यो-यो टेस्ट झाली असून त्यामध्ये अनेकजण पास झालेत. मात्र दोन खेळाडू के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी यो-यो टेस्ट दिली नाही.

के. एल. राहुल याला आशिया कपमध्ये  सामील करून घेतलं असून तो फिट असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता त्याची यो-यो टेस्ट झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत-पाक सामन्यामध्ये तो खेळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाली आहे. जर के. एल. राहुल फिट नसेल तर त्याच्या जागी संघात ईशान किशन याची निवड केली जावू शकते. त्यासोबतच आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंपैकी आशिया कपमध्ये संघात असलेल्या एकाही खेळाडूची यो-यो टेस्ट नाही झाली.

दरम्यान, के. एल. राहुल याने तासभर सराव केला मात्र पळून धावा घेतल्या नाहीत. के. एल. राहुल पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप काहीच निश्चितता नाही. त्यात के. एल. ने यो-यो टेस्ट न दिल्याने क्रीडा वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

आशिया कप 2023 साठी भारतीय संघ-:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.