मुंबई : आशिया कप 2023 मध्ये सुपर 4 फेरीमधील भारतीय संघाचा शेवट कडू झाला. शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा बांगलादेशकडून 6 धावांनी पराभव झाला. प्रमुख फलंजांनी आयत्या वेळी नांगी टाकली आणि शेवटपर्यंत संघाती पडझड काही थांबली नाही. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 266 धावांंचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 259 धावांवर आटोपला. आशिया कपमधील भारताचा हा पहिला पराभव होता, या पराभवाची पाच प्रमुख कारणे जाणून घ्या.
सर्वप्रथम भारतीय संघामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये एक-दोन नाहीतर पाच खेळाडू बदलले गेले होते. वर्ल्ड कपआधी भारतीय संघामध्ये अनेक बदल केले जात आहेत. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याच्या उणीव भासली. बांगलादेशच्या खेळाडूंनी मिडल ओव्हर्समध्ये चांगल्या धावा कुटल्या. प्रमुख खेळाडूंना खाली बसवत त्यांच्या जागी बदल केल्याचा सर्वात मोठा फटका बसला.
बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात स्पिनर्स फेल गेलेले दिसले. आशिया कपमध्ये भारतसाठी हुकमी एक्का ठरलेल्या कुलदीप यादवलाही या सामन्यात स विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी अक्षर पटेल याला संधी देण्यात आलेली. अक्षर आणि जडेजा यांनी 19 ओव्हर्समध्ये 100 धावा बहाल केल्या. याचा फटका भारतीय बसल्याचं दिसून आलं.
रोहित शर्मा, तिलक वर्मा, के.एल. राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जडेजा फेल गेले. रोहित शर्मा बाद झाल्यावर शुबमन गिल याने शतकी खेळी केली होती मात्र त्याला इतर कोणाची साथ मिळाली नाही. गडी एकटा टिकून राहिला होता मात्र दुसरीकडून एकही खेळाडू मैदानात जास्त वेळ तग धरू शकला नाही. फेल गेलेली टॉप ऑर्डर पराभवासाठी जबाबदार आहे.
सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये बॉलरवर तुटून पडतो. जायंटप्रमाणे बॅटींग करणारा सूर्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये अजुन काही यशस्वी ठरला नाही. बांगलादेशविरूद्ध त्यालाही चांगली संधी होती मात्र तो बोल्ड झाला. त्याला वर्ल्ड कप संघात घेतलं आहे मात्र खराब कामगिरीमुळे निवड समितीचं टेन्शन वाढलं आहे.
भारतीय संघाता स्टार ऑलरऊंडर असलेला रविंद्र जडेजा गोलंदाजी दमदार करत आहे. त्याच्याकडे ऑल राऊंडर म्हणून पाहिलं जातं. मात्र 2022 पासून वन डेमध्ये त्याचा फॉर्म काहीसा चांगला दिसला नाही. 2023 मधील सर्वात कमी स्ट्राइक रेटने फलंदाजी करणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलल्यास ज्यांनी किमान 100 चेंडूंचा सामना केला आहे, तर जडेजा 56.79 च्या स्ट्राइक रेटसह अव्वल स्थानावर आहे. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात तो बोल्ड झाला.