मुंबई : आशिया कप स्पर्धेतील दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या संघात होत आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका एकदिवसीय सामन्यात 51 वेळा आमनेसामने आल आहेत. श्रीलंकेने 40 सामने, तर बांगलादेशने 9 सामने जिंकले आहेत. स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. लहिरु कुमारा, दुशमंथा चमीरा, दिलशान मधुशंका आणि वानिंदू हसरंगा यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेला मुकले आहेत. दुसरीडे, बांगलादेशचे इबादत होसैन दुखापतीमुळे स्पर्धेत खेलणार आहे. त्यात श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी ओपनर लिटन दास आजारी पडल्याने पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
द पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी योग्य आहे. त्यामुळे सामना कधी कसा फिरेल हे सांगता येत नाही. खासकरून मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू सामन्याचं चित्र पालटू शकतात. या सामन्यात पहिली फलंदाजी करणारा संघ 200 धावांपर्यंत मजल मारू शकतो. दुसरीकडे ही धावसंख्या गाठणंही तसं कठीण असल्याचं पाहिलं गेलं आहे. आतापर्यंत धावा गाठण्याची विजयी टक्केवारी 60 टक्के इतकी आहे.
टीम1 : कुसल मेंडिस, कुसल परेरा, दिमुथ करुणारत्ने, पाथुम निस्सांका, नजमल होसैन शांतो, चरिथ असलंका, शाकिब अल हसन (कर्णधार), मेहिदी हसन मिराज, दासुन शनाका, धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), महिश थिकशाना
टीम2 : कुसल मेंडिस, कुसल परेरा, दिमुथ करुणारत्ने, पाथुम निस्सांका (उपकर्णधार), नजमल होसैन शांतो, चरिथ असलंका, शाकिब अल हसन, मेहिदी हसन मिराज, दासुन शनाका, धनंजय डिसिल्वा (कर्णधार), महीश थिकसाना.
बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, नजमुल होसैन शांतो, तोहिद ह्रिदोय, मुशफिकर रहिम, अफिफ होसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमुद, मुस्तफिझुर रहमान, शोरिफुल इस्लाम, नसुम अहमद, शक महेदी हसन,नईम शेख, शमिम होसैन, तन्जिद हसन तमिम, तन्झिम हसन सकिब.
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जनिथ परेरा, कुसन मेंडिस, चरीथ असलंका, धनंजय डिसिल्वा, सदीरा समीरविक्रमा, महीश ठीकशाना, दुनिथ वेल्लालाज, मथीशा पथिराना, कसुन रजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मधुशन.