Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, या युवा खेळाडूकडे कर्णधारपद

| Updated on: Jul 04, 2023 | 9:21 PM

Asia Cup 2023 Team India A Suqad | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Asia Cup 2023 |  आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, या युवा खेळाडूकडे कर्णधारपद
Follow us on

मुंबई | आशिया कप स्पर्धेची सुरुवात 31 ऑगस्टपासून होणार आहे. तर अंतिम सामना हा 17 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि श्रीलंका इथे हायब्रिड पद्धतीने करण्यात आलंय. या आशिया कप स्पर्धेत टीम इंडियासह एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघांमध्ये अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 13 पैकी 4 सामने पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आली आहेत. या स्पर्धेचं सामनेनिहाय वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या दरम्यान आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा

आशिया कप स्पर्धेबाबत थोडक्यात

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे कोलंबोत 13 ते 23 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. एशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये

आशिया कप स्पर्धेसाठी एकूण ए आणि बी असे एकूण 2 ग्रुप आहेत. ए ग्रुपमध्ये श्रीलंका ए, बांगलादेश, अफगाणिस्तान ए आणि ओमान ए या संघाचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये टीम इंडिया ए, नेपाळ ए, यूएई ए आणि पाकिस्तान ए असे 4 संघ आहेत.

दोन्ही ग्रुपमधील पहिल्या 2 टीम हे सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील. पहिला सेमी फायनल सामना हा ही ग्रुप एमधील अव्वल टीम विरुद्ध ग्रुप बीमधील दुसऱ्या क्रमांकाची टीम असा होईल. तर दुसरा उपांत्य सामना हा ग्रुप बीमधील अव्वल संघ विरुद्ध ग्रुप एमधील दुसऱ्या क्रमांकावरील संघ असा होईल. तर 23 जुलै रोजी महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना होईल.

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया ए

यश धुल (कॅप्टन), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), साई सुदर्शन, निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.

एसीसी मेन्स एमर्जिंग एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया

राखीव खेळाडू : हर्ष दुबे, नेहल वढेरा, स्नेल पटेल आणि मोहित रेडकर.

यश धुल याच्याकडे कर्णधारपद

टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप यश धूल याने आपल्या नेतृत्वात जिंकून दिला होता. या यश धूलला आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबादारी देण्यात आली आहे. यश धूल याने आतापर्यंत 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 49.78 च्या सरासरीने 1 हजार 145 धावा केल्या आहेत. यशने या दरम्यान 4 शतक आणि 4 अर्धशतकं ठोकली आहेत.