मुंबई : टीम इंडिया आशिया कपसाठी सज्ज झाली असून आता संघ संतुलित वाटत आहे. मिडल ऑर्डरचा प्रश्नही आता सुटला आहे कारण श्रेयस अय्यर फिट झाला आहे. मात्र सराव शिबिरामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आशिया कपमध्ये रोहित शर्मा ओपनिंगला खेळायला येणार असल्याची माहिती समोर आलीये. सराव शिबिरामध्ये रोहित आणि श्रेयस दोघे नेटमध्ये सराव न करत ओपन फिल्डिंग लावून सराव करत होते.
रोहित शर्मा आणि अय्यरच्या भागादारीवरून एक दिसून आलं की दोघे एकत्र मिडल ऑर्डरमध्ये खेळायला येणार असल्याचं दिसत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. टीम इंडियाच्या प्लेइंग11 मध्ये मग सलामीला दोन्ही युवा खेळाडू उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
के.एल. राहुल बाहेर पडल्यामुळे आता ईशान किशन याची जागा फिक्स झाली आहे. मात्र किशन फलंदाजीला कुठे उतरणार हे अद्याप काही फिक्स नाही. मात्र रोहित जर मिडल ऑर्डरमध्ये खेळला तर किशन हा सलामीला येणार हे फिक्स आहे. शुबमन गिल आणि ईशान किशन या दोघांनी वनडेमध्ये द्विशतक ठोकली आहेत. मात्र रोहितने हा निर्णय घेतला तर त्याच्यासाठी तो कितपत फायदेशीर ठरू शकतो.
रोहित शर्मा याची चौख्या क्रमांकावरची आकडेवारी पाहिली खराब आहे. टीम इंडियासाठी हा चाल म्हणजे हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखी आहे. कारण मिडल ऑर्डरमध्ये 31.08 च्या सरासरीने 715 धावा केल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रमांकावर खेळताना त्याचा स्ट्राईक रेट अवघा 78 आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).