Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध! ‘या’ दिवशी भारत-पाक सामना

| Updated on: Jul 04, 2023 | 4:24 PM

Asia Cup 2023 Draft Schedule | आशिया कप 2023 यंदा वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. एकूण संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध! या दिवशी भारत-पाक सामना
Follow us on

मुंबई | एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने 15 जून रोजी बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. एसीसीने या वेळापत्रकात एकूण किती सामने होणार, तसेच सलामीचा आणि अतिंम सामना केव्हा होणार याची माहिती दिली. सोबतच आशिया कपचं आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका इथे होणार असल्याची माहिती दिली. एसीसीने हायब्रिड पद्धतीने आशिया कपचं आयोजन केलंय. मात्र एसीसीने सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे टीम इंडियाचे सामने केव्हा होणार, त्यातही भारत-पाक साामना केव्हा होणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून राहिली आहे. दरम्यान आता मोठी अपडेट समोर आली आहे.

आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदाची आशिया कप स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीने आशिया कप स्पर्धेकडे रंगीत तालीम म्हणून पाहिलं जातंय. वनडे वर्ल्ड कपसाठी टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी एशिया कपमधील कामगिरी ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार हे नक्की.

टीम इंडिया-पाक सामना केव्हा?

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे जर तरच्या समीकरणारनुसार, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तब्बल 3 वेळा सामना होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व एकूण 6 क्रिकेट संघांना आशिया कप स्पर्धेचं ड्राफ्ट शेड्यूल पाठवण्यात आलं आहे. या ड्राफ्ट शेड्यूलनुसार, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 3 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील दांबुला इथे खेळवण्यात येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

आशिया कप 2023 बाबत थोडक्यात सर्वकाही

आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदावरुन गेल्या अनेक महिन्यांपासून वाद रंगला होता. या स्पर्धेचं पाकिस्तानकडे यजमानपद होतं. त्यामुळे बीसीसीआयने आम्ही टीम इंडियाच्या खेळाडूंना पाकिस्तानात पाठवणार नसल्याची भूमिका घेतली होती. यावरुन बीसीसीआय आणि पीसीबीत वाद रंगला होता. मात्र एसीसीने अखेर यातून सुवर्णमध्य काढला. एसीसीने हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि श्रीलंका या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं.

त्यानुसार आता स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आहेत. या 13 पैकी फक्त 4 सामनेच पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर उर्वरित 9 मॅचेस श्रीलंकेत होतील. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 31 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. तर 17 सप्टेंबरला महाअंतिम सामना होणार आहे.

या आशिया कप स्पर्धेसाठी एकूण 6 संघ भिडणार आहेत. या 6 संघामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचा समावेश आहे. नेपाळची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

6 टीम 2 ग्रुप

आशिया कप स्पर्धा यंदा वनडे फॉर्मेटनुसार पार पडणार आहे. एकूण 6 संघांना 2 गटात विभागण्यात आलंय. त्यापद्धतीने टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 टीम आहेत. दोन्ही ग्रुपमधून एकूण 4 टीम्स सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.

त्यानंतर सुपर 4 मध्ये रॉबिन राऊंड फॉर्मेटनुसार एकूण 6 सामने होतील. यानंतर 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील आणि त्यांच्यात आशिया चॅम्पियन होण्यासाठी लढत होईल.